औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत सिल्लोड येथे 105 पैकी 104 जणांचे मतदान
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.21, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होवू घातलेल्या निवडणूकीसाठी रविवार ( दि.21 ) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सिल्लोड येथील दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात मतदान घेण्यात आले. सोसायटी मतदार संघाच्या 84, बिगर शेती मतदार संघात 17 तर प्रक्रिया मतदार संघात 4 अशा एकूण 105 मतदान पैकी 104 असे जवळपास 99 टक्के मतदान शांततेत पार पडले. महसुल राज्यमंत्री तथा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार ना. अब्दुल सत्तार तसेच बाजार समितीचे सभापती तथा उमेदवार अर्जुन पा. गाढे , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असून या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येथील असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.