नागपूर पदवीधर मतदार संघात सांप्रदायिक भाजपाच्या उमेदवाराचा पराभव सुनिश्चित करा:- कॉ. तुकाराम भस्मे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या, नागपूर विभागातील जिल्हा प्रमुख नेत्यांची बैठक राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेची अध्यक्षता राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. हौसलाल रहांगडाले यांनी केली.
राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. शिवकुमार गणवीर यांनी प्रास्ताविक भाषण केले. नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. भाजपा मधील अंतर्गत संघर्षामुळे, गेल्या ३५ वर्षापासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात त्याचा निश्चित पराभव केल्या जाऊ शकतो. तेव्हा पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवाराचा पराभव करण्याकरिता रणनीती तयार करण्यात आली.बैठकीत काँ.मिलींदगणवीर,काॕ.हौसलाल रहागंडाले(गोदींया)कॉ. डॉ. महेशकोपुलवार(गडचिरोली) , कॉ. विनोद झोडगे (चंद्रपूर) , कॉ. असलम पठाण (वर्धा), कॉ. हिवराज उके, कॉ. माधवराव बांते ( भंडारा). कॉ. श्याम काळे, कॉ. अरुण वनकर, कॉ. युगल रायलु, कॉ . सुधाकर वाघुके, कॉ. अजय साहू (नागपूर) हे उपस्थित होते
आपला नम्र
कॉ. श्याम काळे
राज्य कार्यकारणी सदस्य, भाकप
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535