BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र

मुदतीपुर्वी घर टैक्स भरनार्या नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण व सत्कार

Summary

वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे          काटोल तालुक्यातील गणेशपूर(शेकापूर- कलमुंडा) ग्राम पंचायतीचे अंतर्गत ज्या नागरिकाने २०२४-२०२५ वर्षाचा कर भरणा ०१एप्रिल पुर्वी करणारे नागरिकाला ध्वजारोहण चा मान देण्यात आला. गणेशपूर शेकापूर (कलमुंडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी राजेश मडके यांनी २६जानेवारी पासून […]

वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
         काटोल तालुक्यातील गणेशपूर(शेकापूर-
कलमुंडा) ग्राम पंचायतीचे अंतर्गत ज्या नागरिकाने २०२४-२०२५ वर्षाचा कर भरणा ०१एप्रिल पुर्वी करणारे नागरिकाला ध्वजारोहण चा मान देण्यात आला.
गणेशपूर शेकापूर (कलमुंडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी राजेश मडके यांनी २६जानेवारी पासून ग्राम पंचायत घर कर भरणा वसुली करिता विषेश योजना राबविण्याचे ठरविले. यात चालू वार्षिक वर्ष २०२५-२०२५वर्षाचा घर कर भरणा मुदत पुर्वी काळात (एडवांस मधे) करणारे ग्रामस्था सत्कार व त्यांच्या च हस्ते एक मे महाराष्ट्र दिना ला ग्राम पंचायत कार्यालयाचा तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान देण्याचे जाहिर केले होते. या आवाहनाला मान देत येथील नागरिक रामुजी रूजबा बागडे यांनी मुदपुर्व घर कर भरणा केल्याने सरपंच व ग्राम पंचायत कमेटी ने रामुजी बागडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व एक मे रोजी गणेशपूर (शेकापूर- कलमुंडा) गट ग्राम पंचायतीचा ध्वजारोहण ही यांचे हस्ते करून नवीन पायंडा पडला.
या प्रसंगी ग्राम पंचायत सरपंच संजीवनी मडके, उपसरपंच अशोक भोयर, ग्रा प. सदस्य -सुनिताताई वैद्य,बारसी ताई कोवे, मिनाताई कोकोडे,दिव्या ताई कोकोडे, जि प शिक्षक गणेश कोचे,माजी पोलिस पाटील धनराज ऊईके, तसेच मैनाबाई मडावी, कुसुमताई ऊईके, रोहिणी ताई धुर्वे,राजेश मडके, ज्ञानेश्वर वैद्य, रामचंद्र राऊत, गौतम बागडे सह अनेक ग्रामस्थांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *