नऊ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
प्रसूतीसाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांना सोलापूर येथील लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई शुक्रवारी (ता. 29) रोजी दुपारी 12 च्या सुमारास कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली.
सोलापूर येथील लाचलुचपत खात्याचे पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी ऍडमिट झाली होती.
डॉक्टरने प्रसूतीसाठी 10 हजार रुपयांची मागणी महिलेच्या पतीकडे केली. त्या वेळी नऊ हजार रुपये देण्याचे ठरले.
महिलेच्या पतीने लाचलुचपत खात्याकडे संपर्क साधला पोलिस निरीक्षक कविता मुसळे, कॉन्स्टेबल उमेश पवार, स्वप्नील संकी या पथकाने डॉ. अडगळे यांना नऊ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत खाते व कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750