दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाला मिळणार जगण्याचा आधार : ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
Summary
नाशिक, दिनांक 5 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगाच्या अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून या मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक दिव्यांगाना जगण्याचा आधार व बळ मिळेल […]
नाशिक, दिनांक 5 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगाच्या अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून या मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक दिव्यांगाना जगण्याचा आधार व बळ मिळेल असा विश्वास मंत्री दर्जा वि.स.स. अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला. आज शहरातील ठक्कर डोम येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानगरपालिका भालचंद्र गोसावी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, सीमा अहिरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद परदेशी, वर्षा फडोळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसिलदार राजश्री अहिरराव, रचना पवार, अमोल निकम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. बच्चू कडू पुढे म्हणाले, आज नॅब स्कूलला दिलेल्या भेटीत दिव्यांग बालकांची सर्व शिकण्याची लालसा, निस्वार्थ मन व त्यांचा आत्मविश्वास पाहून भावनावश झालो. या मुलांची शिकण्याची उमेद प्रशंसनीय आहे. आज येथे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने व ताकदीने उपस्थित झाले आहेत. दिव्यांगाच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशांतील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात राज्य शासनाने स्थापन केले आहे. दिव्यांग मंत्रालय दिव्यांग बांधवांसाठी आधार केंद्र ठरले पाहिजे तसेच दिव्यांगाच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल, त्यांना हव्या असलेल्या सर्व सेवा-सुविधा त्यांना प्राप्त होण्यासाठी तसेच दिव्यांगांना काय हवे काय नको ते जाणून घेण्यासाठी सर्व राज्यभरात या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दिव्यांग बांधव एक नवीन विश्वास मनात घेवून सर्व क्षेत्रात अग्रेसर राहीला हिच दिव्यांग मंत्रालयाची संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने सदैव प्रशासनाच्यावतीने प्रयत्नशील राहणार असल्याचे मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेत आहेत. प्रशसानातील अधिकारी यांनी आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांसाठी दिला तर निश्चितच दिव्यांगांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनांची जनजागृती होईल. अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांका व्यतिरिक्त उर्वरित 5 टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेवून हा लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिव्यांग मंत्रालयासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, दिव्यांगांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो तसेच शासकीय योजनांचा फायदा होण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अडचणी येतात. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे प्राप्त करून देण्यासाठी शासनाने “दिव्यांग कल्याण विभाग आपल्या दारी” हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाची सुरुवात दिनांक 6 जून 2023 पासून राज्यात करण्यात आली आहे. आज नाशिक जिल्ह्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या आयोजित कार्यक्रमात आज सुमारे 4 हजार दिव्यांग बांधवांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देखील लाभ देण्यात येत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक व मालेगाव महानगरपालिका यांच्या समन्वयाने आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी विविध विभागांच्या माध्यमातून 40 स्टॉल उभारण्यात आले असून, दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, कार्यालयाच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार चर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था यांचा प्रामुख्याने या अभियानात सहभाग घेऊन व्यापक प्रमाणात योजनांची माहिती या निमित्ताने दिव्यांगांना आज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या असलेल्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्या समस्यांबाबत निश्चितच उपाययोजना करून यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचे फित कापून बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी भावना चांडक नॅब स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सीमा पेठकर तर आभार प्रदर्शन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्यने जिल्हाभरातील दिव्यांग बांधव व त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांगा बांधवांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित दिव्यांग बांधव व त्यांच्या पालकांना अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मालेगाव येथील मुदतशीर हुसैन शबीर अहमद यांना मालेगाव महानगरपालिकेतर्फे दिव्यांग भवन आणि कार्यालय उभारण्यासाठी 50 लाखांचा धनादेश व प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची चावीचे वितरण बच्चू कडू व मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
या लाभांचे दिव्यांग बांधवांना झाले वितरण
Ø महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्या. नाशिक या विभागांतर्गत दिर्घ मुदत कर्ज योजनेचा लाभ धनादेश वाटप
श्री. रावसाहेब नारायण माळोदे, नाशिक (1.50 लाख)
श्री. अजय दामोदर मुळक, कसबे सुकाणे (1.50 लाख)
श्री. शरद गंगाराम ठाकरे, नाशिक (2 लाख)
Ø जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागांतर्गत योजनेचा लाभ
श्री. त्र्यंबक दुसाणे, नाशिक (पालकत्व दिले)
श्रीमती राजेश्वरी चौधरी, नाशिक (श्रवणयंत्र)
श्री. कपिल बच्छाव,नाशिक (पालकत्व दिले)
संजय चिलाजीगंधे, नाशिक (UDID CARD)
श्री. रोहन काकडे, नाशिक (श्रवणयंत्र)
Ø महाराष्ट्र ग्रामीण जीवनौन्नती अभियान (DRDA) फिरते निधी रक्कम रुपये 15000/-
यमुना सिताराम वाघमारे, दिंडोरी
लिलाबाई गांगोडे, दिंडोरी
Ø संजय गांधी निराधार योजनेतंर्गत संजय गांधी दिव्यांग लाभार्थी
सुमेद सुजित कातकडे, भगुर
इरफान अब्दुल कादर मनियार, भगुर
अकील गणेश शेख, जखोरी
Ø रेशनकार्ड (शिधापत्रिका) अंतर्गत अंत्योदय पिवळे रेशनकार्ड लाभार्थी
खैरनार संजय पोपट, आडगाव
खांडबहाले तानुबाई त्रंबक, महिरवणी
पठाण आयुबहसन, पळसे
Ø सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र
जुलेया राशिदशेख, नाशिक
सुभाष निकाळजे, नाशिक
Ø साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लाभार्थी
अंबादास दादा मेहतारे, लासलगांव (थेट कर्ज योजना 1 लक्ष)
ललीत मधुकर जाधव, उपनगर नाशिक (किराणा दुकान मंजूरी पत्र)
Ø नाशिक महानगरपालिका, नाशिक
फातेमा अनिश शेख, नाशिक (Cochlear Implant अर्थसहाय्य 5 लाख)
उत्कर्ष उमेश घोंगडे, नाशिक (Cochlear Implant अर्थसहाय्य 5 लाख)
दीपक दादू सरोदे, नाशिक (बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य योजना 3000 रु. प्रति महिना)
सारीका बाळु कुमावत, नाशिक (बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य योजना 3000 रु. प्रति महिना)
मंगल दीपक अभंग, नाशिक (बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य योजना 3000 रु. प्रति महिना)
Ø संजय गांधी निराधार योजना मनपा क्षेत्र, नाशिक दिव्यांग योजना लाभार्थी
निर्मला दिनेश माळी, नाशिक
नंदा अमोल सरोदे, नाशिक
आरती भास्कर थोरात, नाशिक
Ø छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, नाशिक (सारथी) विभागांतर्गत CSMS संगणक कोर्स मोफत प्रवेश
शेखर संतोष शेळके, नाशिक
मोहिनी प्रभाकर देवरे, नाशिक