आता!विरोधकांनी एकजूट दाखवावी अजून वेळ आहे! विरोधकांनी एकजूट दाखवावी !!! सत्तेतही येवू शकतात सत्तारूढ पक्षाचे बूथ मजबूत गवो गावच्या मैदानी कर्यकर्ते्यांना विचारत घ्या
Summary
कोंढाळी/काटोल -प्रतिनिधी- दुर्गा प्रसाद पांडे सध्या लोकसभा निवडणुकीचा रणधूमाळी सुरु आहे, निवडणुकीचे वातावरण आहे, सत्ताधारी किंवा विरोधी राजकीय पक्षांची निती हीन राजकिय कार्यक्रम लक्षात घेता मतदारही निवडणुकीला गांभीर्याने घेत नाहीत. सत्ताधारी पक्षाने स्वस्त: राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्यांच्या मतदारांनी […]
कोंढाळी/काटोल -प्रतिनिधी- दुर्गा प्रसाद पांडे
सध्या लोकसभा निवडणुकीचा रणधूमाळी सुरु आहे, निवडणुकीचे वातावरण आहे, सत्ताधारी किंवा विरोधी राजकीय पक्षांची निती हीन राजकिय कार्यक्रम लक्षात घेता मतदारही निवडणुकीला गांभीर्याने घेत नाहीत.
सत्ताधारी पक्षाने स्वस्त: राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्यांच्या मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सरकारांना ईडी, सीबीआय, आयटी, ईओडब्ल्यू, एनसीबी या सरकारी यंत्रणांच्या अधिकारांचा गैरवापर करून राज्य सरकारांना खाली खेचले आहेत, राज्य सरकारांना खाली न आणल्यास खोके व घोडेबाजार करून आपली अनैतिक सरकार बसवीलीआहे. भ्रष्ट आमदार खरेदी वगैरे अनैतिक राजकारण जनतेला कळून चुकलेआहे., त्यामुळे आता राज्यात आणि केंद्रातही विरोध पक्ष नको या स्वस्त युक्तीमुळे विरोधी पक्षात फूट पडल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत.
सत्ताधारी वर्ग श्रीमंतांना(अब्जोपती -उद्योजकांचे)अब्जो कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देत आहे. या उलट देशाचा पोशिंद्याला (शेतकरी), शेतमजूर, कामगार ,बेरोजगारांची फसवणूक करत आहे.कंत्राटी कामगार तत्वावर नोकर भरती करत आहे. या सर्वांच्या निकृष्ट दर्जामुळे राजकारणा मुळे मतदारही मतदानाबाबत उदासीन आहेत.
निवडणुकीचा मोसम आहे, आता मोसम आहे म्हटल्यावर, निवडूनकिचा रंग चढणारच, इव्हेंट मॅनेजमेंट अ़तरगत तळागाळातील कार्यकर्त्यांऐवजी राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेत्यां समोर चमकोगीरी करत राहणाऱ्या किंवा नागपुरात राहून उंटावरून बसून राजकारण हाकणारे बेगडी पदाधिकार्यांवर विश्वास ठेवून गावोगावी राजकारण करण्याचा आव आणत आहेत. या कारणांमुळे निवडणूक रंग बदलत आहे., मोठमोठे राजकीय पक्ष नैतिकता विसरून आपल्याच कार्यकर्त्यांऐवजी शेवटच्या क्षणी आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देत आहेत. आणि उमेदवारही केवळ प्रादेशिक नेत्यांपुरतेच मर्यादित *औपचारीकतेसाठी, पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी गावोगावी जाऊन शुभेच्छा देण्याची औपचारिकता पूर्ण करत आहेत*. तेच मोठे राजकारणी तर ग्रासरूट लेव्हल चे अस्सल मैदानी कार्यकर्त्यांना बाजूला सारुन टिनोपाल प्रणित कार्यकर्त्यांना वेळेवर पुढे आणले जात आहे.
खरे तर! मतदारांमध्ये सत्ताधारी पक्षावर नाराजी आहे. मात्र त्यांच्या नाराजीचा फायदा विरोधी पक्षाला घेता येत नाही. आता ग्रामीण भागात सत्ताधारी पक्षाविरोधात रोष असतानाही सत्ताधारी पक्षाच्या बूथची ताकद आणि संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या बूथनिहाय मेहनतीमुळे मतदारांच्या संतापाचे रुपांतर आपल्या कडे मतदानात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या करीता विरोधक एकजूट असने फार गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षावर मतदारांच्या रोषाचा फायदा घेण्यास विरोधक असमर्थ असल्याचे दिसते. राजकारण प्रत्येक क्षणी बदलत आहे, बदलत्या राजकारणाचा फायदा आर्थिकदृष्ट्या सक्षम सत्ताधारी पक्षाचे नेतेच घेत आहेत. मिशन 45 साठी, सत्ताधारी पक्ष 45+ साठी सर्व हुक किंवा कुक् चे माध्यमातून आपल्या अब्जोपती मित्रांच्या निवडणूक बॉन्डची लूट होतांना दिसत आहे. मात्र निवडणूक निधीतून केवळ सत्तेच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनाच समृद्धी मार्ग दिसत आहे.
मतदार *पब्लिक है! यह पब्लिक सब जानती है*, विरोधीपक्ष कांग्रेस चे खाते सील आहे .तर, सत्तेत असलेल्या पक्षाकडे केवळ संपत्ती आहे, ईडि सी बी आय. घरो घरी टी वी आहे. मोठे मिडीया हाऊसेस व बडे बडे धर्मेगुरू आप आपल्या संपत्ती ला वाचविण्यासाठी सत्ता रूढ़ पक्षाचे लंगूलांचन करत आहे.जनतेला सर्व काही माहित आहे.
आता ज्याचे बूथ मजबूत तो पक्ष जिंकेल, मतदारांचे नाराजीचा फायदा विरोधक उचलू शकत नसतील तर,मग विरोधक पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडतील.पण ते आपल्या ग्रामीण कार्यकर्त्यांना भेटत नाही. त्याचा फायदा सत्ताधारी पक्षालाही होऊ शकतो.
अजून वेळ आहे. विरोधकांनी एकजूट दाखवावी, सत्ताधाऱ्यांना जागा दाखवता येऊ शकते.