हेडलाइन

अहो साहेब!काटोल मधील मोकाट कुत्र्यांना आवरा हो!!!   काटोलवासियांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Summary

अहो साहेब!काटोल मधील मोकाट कुत्र्यांना आवरा हो!!! काटोलवासियांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन   काटोल प्रतिनिधी :- दुर्गाप्रसाद पांडे   शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून गेल्या एक वर्षांपासून काटोल शहरातील नागरिक मोकाट व आक्रमक कुत्र्यांमुळे त्रस्त असुन दहशतीच्या वातावरणात रस्त्याने […]

अहो साहेब!काटोल मधील मोकाट कुत्र्यांना आवरा हो!!!

काटोलवासियांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

काटोल प्रतिनिधी :- दुर्गाप्रसाद पांडे

 

शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून गेल्या एक वर्षांपासून काटोल शहरातील नागरिक मोकाट व आक्रमक कुत्र्यांमुळे त्रस्त असुन दहशतीच्या वातावरणात रस्त्याने जाणेयेणे करावे लागत आहे प्रत्येक चौकात पंचवीस तीस कुत्र्यांचा कळप दिसुन येतो व आक्रमकपणे मुलांचा, नागरिकांचा तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग करून हल्ला करतात त्यामुळे लहान मुले घराबाहेर खेळण्यास घाबरतात दुचाकीस्वार दहशतीने वेगाने दुचाकी चालवितात त्यामुळे अपघात होऊ शकतो आतापर्यंत या मोकाट व हिंसक बनलेल्या कुत्र्यांनी वार्ड क्रमांक 1 ठाकुर व चांडक लेआऊट येथील रहिवाश्यांवर पाच ते सहा वेळा हल्ला करून जखमी केले आहे त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे निवेदन देताना डॉ. चेतन रेवतकर, संदीप भस्मे, नरेंद्र बालपांडे, अशोक दातीर, हेमंत सावरकर, रवींद्र भोयर, आलोक जयस्वाल, विवेक चौधरी, विशाखा सोमकुवर, वर्षा ठोंबरे, ज्योती आगरकर, सपना बरडे, यांचेसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *