आयआयएम’ कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा
‘आयआयएम’ कॅम्पसच्या उद्घाटनासाठी
राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा
132 एकरवर साकारले आयआयएमचे नवे कॅम्पस
इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ( आयआयएम ) नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे 7 मे रोजी येणार असून ते या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
132 एकर भूमीवर इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरचे कॅम्पस साकारले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले असून मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सद्या 668 विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे.
याठिकाणी 20 हायटेक क्लासरुप आणि 24 प्रशिक्षण केंद्रे तसेच 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.
याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप व नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण 7 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.
8 मे रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती याठिकाणी पोहचणार आहेत. त्यासाठी कार्यक्रमस्थळी सर्व निमंत्रितांनी 9 वाजता पोहोचणे आवश्यक आहे. 9 वाजतानंतर सर्व रस्ते बंद होतील. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी व या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आयआएम व्यवस्थापनाने केले आहे.
यापूर्वी 23 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन होणार होते. दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता हा उद्घाटन सोहळा 8 मे रोजी होत आहे.