BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

▪रात्र वैऱ्याची आहे जागे राहा ▪ ▪स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईला सज्ज व्हा▪ ▪संसदेत जाऊन तेली,तांबोळी काय नांगर चालवणार आहे▪ ▪मूर्खाना ! आतल्या दाराने प्रवेश देऊ नका ▪ ▪ ज्ञानेश वाकुडकर▪ अध्यक्ष ▪लोकजागर अभियान▪

Summary

🔸पोलीस योद्धा स्पेशल 🔸 ▪दलित, बहुजन, ओ बीसी ,आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाच्या समोर सारी आव्हाने उभी आहेत. अगदी दारावर येऊन सज्ज आहेत. काहींना मागच्या दाराने आत प्रवेश देखील केला आहे. आणि त्यासाठी मागील दार उघडून देण्याचे पाप आपल्यातल्याच मूर्ख महाभागांनी मोठया […]

🔸पोलीस योद्धा स्पेशल 🔸

▪दलित, बहुजन, ओ बीसी
,आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाच्या समोर सारी आव्हाने उभी आहेत. अगदी दारावर येऊन सज्ज आहेत. काहींना मागच्या दाराने आत प्रवेश देखील केला आहे. आणि त्यासाठी मागील दार उघडून देण्याचे पाप आपल्यातल्याच मूर्ख महाभागांनी मोठया अभिमानाने केलेले आहे. अशी ही लढाई आहे. कठीण आहे, गुंतागुंतीची आहे, पण आपल्याला ती लढायचीआहे.▪
🔸 पहिल्या स्वातंत्र्याच्या लढाईचा अजेंडा प्रामुख्याने राजकिय होता. इंग्रज्यांच्या हातात असलेली राजकीय सत्ता आपल्या हातात घेणे , हे लढाई चे
प्रमुख सूत्र होते .
मुळात पेशव्यांच्या
नाकर्तेपणामुळे इंग्रजांच्या हातात गेलेली सत्ता परत मिळविणे आणि ती उच्चवर्णीयांच्याच हातात पुन्हा सोपविणे , या भावनेतून ही लढाई सुरू झाली.
म्हणूनच काँग्रेस ची स्थापना झाली तेव्हा उच्चवर्णीयांचे नेतृत्व त्यावर हावी होते. ओ बी सी -बहुजन समाजाचा त्या स्वातंत्र्या मध्ये समावेश नव्हता. ते फ़क्त उच्चवर्णीय स्वा तंत्र्याचे गुलाम
म्हणून च राहणार होते. म्हणून तर टिळक यांनी ‘ संसदेत जाऊन तेली, तांबोळी काय नांगर चालवणार आहेत का ? ‘ असा उर्मट सवाल केला होता. दलित,ओ बी सी आणि एकूणच बहुजन यांना मतदानाचा अधिकार देखील असणार नाही, अशी योजना या तथाकथित कुटील स्वातंत्र्यामागे होती.
पण भारतीय
राजकारणात गांधींचा प्रवेश झाला आणि उच्चवर्णीयांच्या कारस्थानाला हादरे बसायला सुरुवात झाली ( आणि खरं तर हेच गांधी हत्येमागील खरे कारण आहे ) गांधी देशभर फिरले. ग्रामीण भारताचा अभ्यास केला. देश आधी नीटपणे समजून घेतला आणि नंतर स्वतः पासून लढाई ची सुरुवात केली. गांधीजी केवळ पुस्तकी तत्वज्ञान मांडत बसले नाहीत तर त्यांनी स्वतःचे जीवन हीच एक प्रयोगशाळा करून टाकली. स्वतःपासून सुरुवात केली. बुद्ध रानावनात गेले, चिंतन केले आणि नंतर समाजासाठी समाजाकडे परत आलेत. गांधी देशात फिरले , माणसांत फिरले , देश समजून घेतला ,चिंतन केले आणि देशाच्या भौतिक स्वातंत्र्यासह माणसाच्या आध्यत्मिक स्वतंत्र्याचे प्रयोग सुरू केले, शिकत गेले , प्रयोग करत गेलेत. काळानुरूप बदलत गेलेत . सत्याच्या जवळ जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला. गांधींची संपूर्ण फिलॉसॉफी मुळात मातीतून उगवली . जगण्यातून आकारास आली . त्या अर्थाने गांधी हा मातीतून उगवलेला नवा बुद्ध, असे म्हणायला हरकत नाही!
दुसऱ्या स्वतंत्र्याच्या लढाई चा अजेंडा हा पहिल्या स्वतंत्र्याच्या लढाई पेक्षा जास्त व्यापक असणार आहे. दोन्ही मध्ये मूलभूत फरक देखील आहे.
तुलनात्मक दृष्टीने काही बाबतीत पहिली लढाई सोपी होती, असेहि म्हणता येईल , कारण तेव्हा शत्रू बाहेरचा होता . स्पष्टपणे ओळख ता येत होता. आताचा शत्रू आतला आहे, घरातला आहे , नीच आहे , कपटी आहे, सरड्यासारखा रंग।बदलणारा आहे .
इंग्रजाना प्रामुख्याने आपल्या भौतिक साधनांचा हव्यास होता . ती ओर बाडून त्यांना आपल्या देशात न्यायची होती. इथून कच्चा माल नेणे , त्यावर प्रक्रिया करून पुन्हा भारतात विकणे, हा त्यांचा मुख्य कार्यक्रम होता. म्हणजे त्यांना भारत हा एक मोठी बाजारपेठ म्हणून हवा होता. मात्र आताच्या आमच्या शत्रूंना ओ बी सी , बहुजन , शेतकरी, कामकरी हा फक्त गुलामच म्हणून हवा आहे.
यांना केवळ राजकीय ,
भौ तिक शोषण करायचे नाही,
तर तुमचे आमचे धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण विषयक व आर्थिक शोषण करावयाचे आहे. त्यांना आपण तसे नकोच आहोत
देशाची लोकसंख्या सध्या १३८ कोटी आहे . त्यातले ८५ % म्हणजे सुमारे ११५ कोटी दलित, ओ बी सी , बहुजन, अल्पसंख्य आहेत. हे त्यांच्या डोळ्यात सलते आहे. टोचत आहे. ही संख्या त्यांना नको आहे. ती त्यांना काहीही करू न कमी करायची आहे .
त्यासाठी त्यांचा पुढचा कार्यक्रम असेल ‘ ३३ कोटी देवांचा देश—! ‘ त्या साठी ते नवीन तत्वज्ञान समोर आणतील.
ढुंगणाला धड लंगोट नाही , पण तरीही विश्वगुरु बनण्याच्या बाता मारणे , हे त्यांचे उपद्व्याप आपण पाहत आहोतच !!! त्याची झिंग आपल्यातल्या बै ता ड बहुजनांना लवकरच चढते . आज
रामराज्याच्या गोष्टी करतात , उद्या ते ‘ तेहत्तीस कोटी देवाचे राज्य ‘—– अशा थापा मारायला सुरुवात करतील आणि आपल्यातलेच मूर्ख आनंदाने उड्या मारतील – – – – – !!!
११५ कोटीमधील बहुसंख्य लोकांचा खात्मा करण्यासाठी कोरोनासारख्या माह माऱ्या अश्या विकृतीला नेमका हातभार लावत असतात . त्यासाठी कोरोनाची त्यांना मदत हवी आहे का ??? केवळ निवडणूक जिंकणे नव्हे , तर कोरोना पसरविणे हा कुणाचा छुपा अजेंडा होता का ??? तुम्हा आम्हाला उपचार मिळू नयेत, औषध मिळू नयेत , तुमच्या मरणाची शहानिशा होऊ नयेत, तुमच्याशी संवेदना व्यक्त करण्यासाठी घरचे लोक देखिल जवळ असू नयेत, अशा प्रकारची भयानक दहशत आता निर्माण झाली आहे. लोकांना औषधे देऊ नका, आमच्या परवानगी शिवाय खरेदी करु नका या अटी कशासाठी ?? या मागे कुणाचा मेंदू आहे ?? महामारीच्या काळात आजवर कधीही आणि कोणत्याही सरकारने लस देतांना जनतेकडून पैसे घेतलेले नाहीत. आणि हे लोक मात्र ६०० रुपये मागत आहेत. बाकी उपचार आणखी वेगळे च !!!
सरकारला असले समाजद्रोही , आत्मघातकी सल्ले कोण देत असेल ??? कुणाच्या दबावाखाली असले निर्णय घेतले जातात ??? येनकेन प्रकारे देशाची लोकसंख्या कमी करायची , तेहत्तीस कोटी देवाचे राज्य स्थापन करायचे . आणि त्यासाठी भक्तांनी त्याग करायचा . आत्म बलिदान करायचे . अशी ही बदमाश आणि धूर्त योजना !!! म्हणजे , जसा तुकाराम महाराजांचा खून करून त्याला पुष्पक विमानाची भाकड कथा जोडण्यात आली , तशीच एखादी नवी ‘ सामूहिक मोक्ष योजना ‘ लागू करण्यासाठी लोकांची मानसिक तयारी करणे सुरू आहे का??? मेलेल्या माणसाच्या मरणाला त्यागाचा झकास मुलामा चढवण्याची नागपूर ब्रँड सुरस कथा तर अगदी ताजीच आहे !!!
ही सारी आव्हाने दलित , बहुजन , ओ बी सी, आदिवासी, अल्पसंख्याक समूदा याच्या समोर उभी आहेत. अगदी दारावर येऊन सज्ज आहे. आणि त्यासाठी मागील दारउघडून देण्याचे पाप आपल्यातल्याच मूर्ख लोकांनी मोठ्या अभिमानाने केलेले आहे.
अशी ही लढाई आहे
आपल्याच शेतात विषाची रोपे तयार होत आहेत . ग्रामीण अर्थव्यवस्था आहे , शेती आहे महिलांचे प्रश्न आहेत , युवकांचा सहभाग आहे , या साऱ्यांचा विचार या दुसऱ्या स्वतंत्र्याच्या केन्द्र स्थानि असणार आहे. तसा तो असायला हवा.
अश्या या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाई चे मुख्य सूत्र , त्याचे नियोजन , त्याचा आराखडा कसा असेल , यावर आपण पुढील लेखात सविस्तर चर्चा करू
या – – – – !!!
तोवर काळजी घ्या, सुरक्षित रहा !!! मेंदूवरील मास्क काढून नाकावर लावा !!!
तूर्तास एवढेच – – – !!!
मो. नं.
९८२२२७८९८८
▪पोलिस योद्धा वेब मीडिया▪
महेश देवशोध ( राठोड )▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *