स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम
मुंबई, दि. १३ – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज सकाळी घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००