सोलापूर ब्रेकिंग ! वाळू माफियांना दणका, सहा वाळू माफियांना सहा महिन्यांसाठी हद्दपार
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/2021/01/images-2021-01-11T183419.036.jpeg)
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातून अनेक वाळु माफिया अवैध वाळू उपसा करतात . जलद श्रीमंत होत असल्याने वाळु कडे अनेक गुन्हेगार वळत आहेत.या मुळे गुन्हेगारी त वाढ होत आहे.
गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी ६ वाळू माफियांना पंढरपूर तालुक्यातुन सहा महिन्यांसाठी हद्दपार केले असल्याचे सांगितले.
शहरातील. सुरज विष्णू पवार (रा जुनी वडार गल्ली) महादेव बाळु काळे (रा जुनी वडार गल्ली) रामा तिम्मा बंदपट्टे (रा संतपेठ) लहु बाबु चव्हाण (रा ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पंढरपूर ) तर ग्रामीण भागातील नागेश शिवाजी घोडके (रा बोहाळी तालुका पंढरपूर ) दादा अरुण लामकाने ( रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर ) हे वारंवार वाळू चोरीचे गुन्हे करणारे सराईत आरोपी आहेत .
यांना पंढरपूर तालुक्यातुन हद्दपार करावे असा प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे .
तो प्रस्ताव मंजूर झाला असून वरील सहा जणांना आज पासून पंढरपूर तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क