BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिल्लोड मतदार संघासाठी अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे 25 लाखांचा निधीला मंजुरी

Summary

सिल्लोड, (शेख चांद प्रतिनिधी, ता. 28) : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल भागात मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी निधीची मागणी केली होती. त्यात […]

सिल्लोड, (शेख चांद प्रतिनिधी, ता. 28) : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल भागात मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी निधीची मागणी केली होती. त्यात अल्पसंख्यांक विभागाने दोन कामांसाठी 25 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास मंजुरी देण्यात आली. त्या कार्यक्रमाअंतर्गत सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल भागात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यात दोन कामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने अब्दुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

*या कामांना मिळाली मंजुरी*

सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल भागासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाने 25 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील कब्रस्तानची संरक्षण भिंत आणि रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी तर सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे शादीखानाच्या बांधकामासाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *