सिएसटीपिएसच्या ऊर्जानगर वसाहतीत बिबट्याने चिमुकल्याचा जिव घेतला
Summary
पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क कोरोना माहामारीचा लाँकडाऊन सुरु झाल्या पासुन नागपूर गेटची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे हा रस्ता. बिबट्या,चित्ता,अस्वल या हिंस्र प्राण्यांचा फेरफटका मारण्याचा मार्ग झाला वसाहतीत प्राण्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले आहे याबाबतची माहिती सिएसटीपिएसच्या व्यवस्थापणाला असूनही त्यांनी […]
पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क
कोरोना माहामारीचा लाँकडाऊन सुरु झाल्या पासुन नागपूर गेटची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे हा रस्ता.
बिबट्या,चित्ता,अस्वल या हिंस्र प्राण्यांचा फेरफटका मारण्याचा मार्ग झाला वसाहतीत प्राण्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले आहे याबाबतची माहिती सिएसटीपिएसच्या
व्यवस्थापणाला असूनही त्यांनी वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना केली असती तर जिवितहानी झाली नसती.
ऊर्जानगर वसाहतीत वास्तव्यास असलेले श्री. उमाशंकर दांडेकर, कॉन्स्टेबल, CISF Unit सीएसटीपस चंद्रपूर यांची ५ वर्षाची कु.लावण्या हिला आज दिनांक २६आँगष्ट२०२० रोजी सायं ६:०० च्या दरम्यान पर्यावरण चौक जवळील न्यू एफ टाईप कडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन घेऊन गेला. मुलीची सर्वांनी सामुहिकरीत्या जंगलात शोध घेतला असता ती एका ठिकाणी म्हणजे रस्त्या पासुन अंदाजे ५० ते ६० फुटाच्या अंतरावर सापडली. सदर मुलीला सिएसटीपिएसच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले असता कु.लावण्याला वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले झालेली घटना ही अतिशय हृदय विदारक घटना असून भविष्यात पून्हा जिवीतहानी होणार नाही यासाठी बिबट्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.या घटनेनंतर रात्रपाळीला जाणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.