सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक न्यायाधीश एन. व्हि. साहू यांचे मार्गदर्शन
Summary
अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन २४ आक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, दिवाणी न्यायालय व अधिवक्ता संघ अर्जुनी मोर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका दिवानी न्यायाधीश एन. व्ही. साहू […]
अर्जुनी मोर.:-
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन २४ आक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, दिवाणी न्यायालय व अधिवक्ता संघ अर्जुनी मोर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका दिवानी न्यायाधीश एन. व्ही. साहू होत्या व प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जे. डी. पठाण, सहाय्यक शासकीय अधिवक्ता सारिका काटेखाये, ऍड. भाजीपाले, ऍड. अवचटे, सायबर सेलचे संजय मारवाडे, वाहतूक विभागातील जुमन वाढई, पर्यवेक्षक महेश पालीवाल, प्रा टी. एस. बिसेन, प्रा. एन. एच. लाडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यायाधीश साहू यांनी पोक्सो (बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०११) अंतर्गत येणाऱ्या विविध नियमांची माहिती दिली. संजय मारवाडे यांनी विद्यार्थ्यांना फेसबुक, व्हाट्सअप यासारख्या सामाजिक माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर जुमन वाढई यांनी वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती दिली. त्यांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून विना परवाना वाहन चालवू नये व तसे केल्यास होणाऱ्या परिणाम विषयी माहिती दिली.
प्राचार्य पठाण यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल व चारित्र्य जपून वापरा. कायद्याच्या चाकोरीत रहा कारण बालवयातील छोटीशी चूक सुद्धा भविष्यात आपल्याला मोठ्या पश्चातापाला सामोरे जायला लावू शकते, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक इंद्रनील काशीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक वृंदांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता ‘हीच आमची प्रार्थना’ गीताने करण्यात आली.