BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सडके ची दुर्दशा जामढवाशीयांचा मतदावर बहिष्काराचा एल्गार काटोल चे तहसीलदार व सहनिवडनूक निर्माण अधिकारी राजू रणवीर यांची मध्यस्थी यशस्वी

Summary

कोंढाळी-प्रतिनीधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जामगढ हे गाव आहे. या गावची लोकसंख्या अंदाजे १२५०ते१३००चे आत आहे. येथे ९००मतदार आहेत. यात भटक्या जमाती चे ४०%, अनुसुचित जाती २५%, अनुसुचित जमाती ०५%तर सामान्य ३०% लोकांची वस्ती आहे. संवेदनशील गांवात या गावाची गणणा […]

कोंढाळी-प्रतिनीधी
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जामगढ हे गाव आहे. या गावची लोकसंख्या अंदाजे १२५०ते१३००चे आत आहे. येथे ९००मतदार आहेत. यात भटक्या जमाती चे ४०%, अनुसुचित जाती २५%, अनुसुचित जमाती ०५%तर सामान्य ३०% लोकांची वस्ती आहे. संवेदनशील गांवात या गावाची गणणा केल्या जाते. असे हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(०६)वर कोंढाळी पासुन सहा किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गापासून जामढग गावापर्यंत जोड मार्गापासून अडिच किलोमीटर अंतरावरील
जामगढ मार्गाची अवस्था फारच खराब आहे. या मार्गाचे दुरावस्थे मुळे दो मानवी अपघाती मृत्यू झाले आहे. तर अनेकांना कायम अपंगत्व आले आहे. येथील मार्गाच्या दुरुस्ती करीता शासन, प्रशासना कडे अनेकदा मागणी करूनही संबंधितांनी कसलेही लक्ष दिल्या गेले नाही. या करीता गया करीता जामगढवासी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहेत. या करीता आज ०३एप्रील रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली. मार्ग दुरूस्ती ची खरोखरच गरज आहे . दुरूस्ती साठी सर्व संबंधित विभागांकडे मागणी केली आहे.मात्र शासन दुर्लक्ष करित आहे. आता या सडकची दुर्दशा दुर होई पर्यंत जामगढ वासी लोकसभे सह योणार्या सर्व निवडनूकांवर बहिष्कार टाकणार असे बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आलेआहे
आता राज्य प्रशासन जामगढ वाशियांना त्यांचे समस्यांचे समाधान करतात की जामढवासी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदावर बहिष्कार घालण्याचा निर्णयावर ठाम राहतात हे पाहणे औचित्याचे ठरेल.
“*तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वी*
जामगढवासीयां कडुन लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची माहिती प्रशासनां पर्यंत पोहचताच काटोल विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, काटोल चे तहसीलदार राजू रणवीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय बांधकाम अधिकारी केदार(जि प)व संजय गभणे (राज्य) उपविभागीय बांधकाम, काटोल पंचायत समिती चे बांधकाम विस्तार अधिकारी, ग्राम सचीव, जया पाटील, राजस्व मंडळ अधिकारी सुरज साददकर, ग्राम अधिकारी गोहते, पोलीस पाटील अरुणा भोंगळे, आदी अधिकारर्यां घेऊन जामगढ येथे पोहोचेल . जामगढ येथे उपस्थित गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मुख्य समस्या म्हणजे राष्ट्रीय महामार्ग जोड ते जामगढ पर्यंत सडक दुरुस्तीच्या बाबद योग्य ती मार्गदर्शन केले व स्थानिक महिला पुरूषांची समजूत घातली. या नंतर स्थानिक नागरिकांनी तहसीलदार राजू रणवीर यांना आगामी निवडणुकीत बहिष्काराचे आवहन मागे घेण्याचे जाहीर केले. अशी माहिती जामगढ येथील नागरीक‌ देविदास खांडेकर, किस्मत चव्हाण, उत्तम काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *