शैला गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश!
Summary
सद्यस्थितीला बंद अवस्थेत असलेली भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पिण्याच्या […]
सद्यस्थितीला बंद अवस्थेत असलेली भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. यासाठी शैला गोडसे यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे.
नुकतेच गोडसे यांनी राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन याबद्दल पाठपुरावा केला. व दुष्काळी भागातील जनतेचे हाल कशाप्रकारे होत आहे याबद्दल ही माहिती दिली.
यावेळी ना.पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून सदर योजना चालू करण्यासंदर्भात सूचना केल्या.
पाणी पुरवठा योजना सुरु झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावी. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही: शैला गोडसे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी
सचिन सावंत मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750