महाराष्ट्र हेडलाइन

शेतकऱ्याच्या पानबुडी मोटर चोरणाऱ्या चोरट्यांना LCB च्या पथकाने केले जेरबंद

Summary

मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी, सारोळे फाटी, पाटकूल, पेनूर आदी शिवारातील शेतातून व कॅनाॅल मधून पानबुडी मोटारी चोरीच्या घटनेप्रकरणी बालाजी उर्फ कार्तिक महादेव डोके (22),अजित नवनाथ सावत (25) दोघे रा.पेनूर ता.मोहोळ जि सोलापूर या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. […]

मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी, सारोळे फाटी, पाटकूल, पेनूर आदी शिवारातील शेतातून व कॅनाॅल मधून पानबुडी मोटारी चोरीच्या घटनेप्रकरणी बालाजी उर्फ कार्तिक महादेव डोके (22),अजित नवनाथ सावत (25)
दोघे रा.पेनूर ता.मोहोळ जि सोलापूर या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

आरोपींकडून 5 पानबुडी मोटारसह एकूण 47 हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.5 मार्च 2021 रोजी मोहोळ पोलीस ठाणे येथे पाटकुल ता. मोहोळ येथील फिर्यादी दादा सातपुते यांनी फिर्याद दिल्याने मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 221/2021 भादविकाक 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

मोहोळ तालुक्यातील मौजे कोन्हेरी, सारोळे फाटी, पाटकूल, पेनूर इत्यादी शिवारातील शेतातून व कॅनाॅल मधून पानबुडी मोटारी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथील काही इसम हे शेतक-यांच्या विहिरीतून, कॅनाॅल इत्यादी ठिकाणातून पानबुडी मोटार चोरून त्याची विक्री करीत असल्याबाबत बातमी मिळाल्याने, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता पेनूर गांवातील काही इसम हे मागील काही दिवसांपासून शेतक-यांच्या पानबुडी मोटार हया चोरून त्याची विक्री करीत असल्याची खात्री झाली.

बातमी प्रमाणे पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथून एका इसमास ताब्यात घेवून वरील गुन्हयांतील चोरीस गेलेल्या मालाच्या अनुशंगाने त्याच्याकडे विचारपूस करता तो सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील काही महिन्यापूर्वी मी व माझा एक साथिदार असे दोघांनी मिळून पाटकुल शिवारातील दादा सातपुते यांचे शेतातील विहीरीतून पानबुडी मोटारची चोरी केली असल्याचे सांगितले.

तसेच त्यांने साथिदारासोबत आणखीन ठिकाणी चोरी केलेल्या 4 पानबुडी मोटार चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरलेल्या पानबुडी मोटार हया गांवातीलच लोकांना विकल्या असल्याचे त्यांने सांगितले.

ज्यांना पानबुडया मोटार विकल्या आहेत त्यांनी सदरच्या मोटारी हया आणून गुन्हयाच्याकामी जमा केल्या आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई करीता मोहोळ पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून आणखीन पानबुडी मोटार चोरीचे गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्षनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.त्याच्या या कामगिरीचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

सचिन सावंत मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *