शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख
मुंबई, दि. 4 : शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबददल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजून दु:ख झाले. विनम्र स्वभाव व नि:स्वार्थ सेवेकरिता परिचित असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांनी उत्तम मंदिर व्यवस्थापनाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.