शासनाच्या दुलऀक्षीत कारभारामुळे झिंगानूर रस्त्याची दुरावस्था, ?

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी दि. 2 मे 2021
दुर्गम भागातील जनतेला योग्य सोयी मिळाव्या. यासाठी शासनाने करोडो रूपये तरतूद केली जाते. परंतु अधिकाऱ्यांच्या दुलऀक्षित कारभारामुळे झिंगानूर ते रमेशगुडम रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जनतेने मागणी करण्यात येऊनही दुरुस्ती केली नाही, अंतर फक्त 8 कि. मी चे आहे. इंग्रज काळात झिंगानूर, रमेशगुडम, कर्जेली बिरारगाट देचलीपेठा हा रस्ता रहदारीचा होता ,परंतु स्वातंत्र्यापासुन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, त्यामुळे 7 – 8, गावांना संपर्क साधायला कोणत्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नाही, राजकीय नेते मात्र निवडणूकीत या भागातून निवडून येतात. परंतु या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यश आली नाही ही फार शोकांतिका आहे. या गंभीर बाबीकडे, मा जिल्हाधिकारी यांनी पराकोटीने लक्ष वेधुन या भागातील रस्त्याच्या बांधकामाची मंजुरी देण्यात यावी. झिंगानूर ते रमेशगुडम, रस्तेची बांधकाम करण्याची मागणी परिसरातील जनतेंनी केली आहे,