शहिद प्रकाश देशमुख आणि पुलवामा हल्यात शहिद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण

कन्हान : – जम्मु काश्मीर च्या पुलवामा येथे १४ फेब्रु वारी २०१९ रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले होते. या पुलवामा हल्ल्याला चार वर्ष झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे शहिद प्रकाश देशमुख आणि पुलवामा हल्यात शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंगळवार (दि.१४) फेब्रुवारी ला तारसा रोड शहीद चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करून प्रामुख्याने उपस्थि त शहीद प्रकाश देशमुख यांच्या आई लीलाबाई देशमुख यांच्या हस्ते शहिद स्मारका वर आणि शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर व शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन ” शहिद जवान अमर रहे…..अमर रहे. . . चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर दोन मिनटाचा मौनधारण करुन शहिद प्रकाश देशमुख आणि पुलवामा हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी शहीद प्रकाश देशमुख यांच्या आई लीलाबाई देशमुख, लहान भाऊ प्रदीप देशमुख, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर, हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, युवराज साकोरे, योगराज आकरे, राजेश पोटभरे, सुरज वरखडे, महेंद्र साबरे आदीने प्रामुख्याने उपस्थित राहुन श्रध्दाजंली अर्पण केली.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क