चांदपूर देवस्थान खुले करण्यासाठी, मंदिराबाहेर महाआरती करून भारतीय जनता पक्षाचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे वतीने मंदिर खोलो आंदोलन करून साकडे घालण्यात आले. शनिवार दिनांक 04/9/2021, सकाळी 11:00 वाजता,
Summary
भंडारा, मध्यप्रदेश सह महाराष्ट्रातील हजारो भाविक, भक्तगण चांदपूर जागृत देवस्थानात येऊन महाबली हनुमंताची पूजा अर्चना करतात, आणि शेजारी असलेल्या चांदपूर तलावाचे निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊन संसाराच्या तणावाचे निवारण करतात, या ठिकाणी सायकॉलॉजीकली देवस्थान+नैसर्गिक वातावरण या दोहोंच्या सानिध्यात अनेक कुटुंबे आरोग्य […]
भंडारा,
मध्यप्रदेश सह महाराष्ट्रातील हजारो भाविक, भक्तगण चांदपूर जागृत देवस्थानात येऊन महाबली हनुमंताची पूजा अर्चना करतात, आणि शेजारी असलेल्या चांदपूर तलावाचे निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊन संसाराच्या तणावाचे निवारण करतात, या ठिकाणी सायकॉलॉजीकली देवस्थान+नैसर्गिक वातावरण या दोहोंच्या सानिध्यात अनेक कुटुंबे आरोग्य सुधारतात. सम्पूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारी मध्ये गर्दीवर नियंत्रण आणि रोगावर नियंत्रण करण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णय आज जेव्हा भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला, तालुक्यात, जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेले अनेक निर्बंध उठवून जनतेला दिलासा देण्यात आला असतांना, चांदपूर सारख्या अनेक मंदिराच्या परिसरातील असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाकडून, मंदिर जनतेसाठी खुला करण्याचा आदेश निघत नसल्याने त्यांचे ध्यानाकर्षण करण्यासाठी, माजी आमदार, विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चरण भाऊ वाघमारे यांचे नेतृत्वाखाली मो.तारिक जी कुरेशी यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने जागृत देवस्थान, चिरंजिवी हनुमान जी च्या मंदिराच्या बाहेर गेट वर महाआरती करून कोरोना संपू दे, महाविकास आघाडी ला मंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आदेश देण्याची बुद्धी दे या संकल्पाने बपेरा, सिहोरा, चुल्हाड, येरली, आष्टी,गर्रा, अंबागड,देव्हाडी, करडी, बेटाळा, वरठी, नेरी-पाचगाव,डोंगरगाव, मोहाडी,आंधळगाव, कान्द्री तुमसर क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने भाविक,भाजप चे कार्यकर्ते या महाआरतीच्या प्रसंगी उपस्थित होते, यावेळी चरण वाघमारे, माजी आमदार भाजप, मो.तारिक कुरेशी,डॉ. युवराज जमाईवार, भाऊराव तुमसरे,डॉ. शांताराम चाफले,अनिल जिभकाटे, ललित शुक्ला, हरेंद्र रहांगडाले,राजेश पटले, संदीप ताले, चंदू पिलारे,हंसराज आगासे,कैलास पडोळे,हरिश्चंद्र बंधाटे,डॉ अशोक पटले,सतीश चौधरी, खुमनलाल चौधरी, डॉ सुरेश पारधी,मेहताब सिंग ठाकूर,म्युरध्वज गौतम,सुभाष गायधने, कांती ढेंगे,बालचंद पाटील,रूपा सोनवाने,हेमराज लांजे,गोपाळ येळे,देवानंद लांजे, गुरुदेव भोंडे,बंटी बानेवार, अजय बडवाईक, अविनाश उपरिकर, उमेश बघेले,भाऊलाल बांडेबूचे, राधेश्याम बांडेबूचे, रवी बोपचे,गोवर्धन शेंडे, निर्मलताई कापसे, फुकटु हिंगे,रामदास हलमारे, परमेश नलगोपुलवार,बैजू बन्सोड, अजय झंझाड,महेश कळंबे, मधुकर पटले,पिंटू सिंग,निशाताई पशीने, सोनू तरारे,मनीषा साठवणे,कुंभारे ताई,नंदू रहांगडाले,दिनेश ढोके, दिगंबर कुकडे,डॉ धनपाल शेंडे,सुनील मेश्राम, सचिन खंगार,अंबादास कानतोडे,महाप्रकाश परबते,सुभाष बोरकर, पिंटू हूड,विकास बिसने,सदन चौधरी, सुनील पारधी,हौसीलाल पारधी,भारत पारधी, घनश्याम बिसने,पप्पू बोपचे, धनराज देव्हारे,जगदीश पंचभाई,नंदलाल गौपाले, सीमाताई गौपाले,संभा धांडे, रमेश हलमारे, शैलेश कडव,अमित जैस्वाल, रामकृष्ण उके,राजेश सेलोकर,विक्रम लांजेवार, जयंत पडोळे,योगराज टेंभरे,ललेश पटले,रणधीर नेमा, संतोष बोपचे,किशोर रहांगडाले, राखेलाल राणे,मनोज पटले,युवराज धुर्वे,कैलास तितिरमारे, शामराव बुधे, मुनिराज मारबते,हिरालाल राऊत,अविनाश रिनके, सतीश सोनवाने, महादेव गौपाले, नावेद शेख,सचिन चरडे, सागर बिसने,मोहित मेश्राम, परिसरातील दुकानदार ईश्वर विठुले,दशरथ विठुले, सेवानंद पुष्पतोडे, राजू मारबते,बणाराम गौपाले, जगदीश बोपचे,रामचंद्र सोनवाने, देवदास विठुले, नरेंद्र चौहान, गोपिकाबाई लांजे,शामकलाबाई शेंडे,निर्मलाबाई नंदनवार,शिलाबाई चोपकर,ललिताबाई विठुले, महादेव जंगळें, रंजनाबाई नंदनवार,रामकृष्ण बडवाईक, प्रकाश बेलूरकर,रविशंकर बडवाईक, आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते, सामान्य नागरिक उपस्थित होते.