हेडलाइन

विनोदी कलाकार भारती सिंग व संबंधित कलाकारांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करा…..

Summary

नागपूर दिनांक 30 सप्टेंबर 2020.आदीवासी समाज शेतकरी आघाडी यांच्या तर्फे नुकतेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी मंत्री, प्रसारणमंत्री व पोलीस अधीक्षक साहेब पालघर, आणि निरीक्षक साहेब कासा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी, कलर्स टीव्ही मालिका द्वारे भारती […]

नागपूर दिनांक 30 सप्टेंबर 2020.आदीवासी समाज शेतकरी आघाडी यांच्या तर्फे नुकतेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी मंत्री, प्रसारणमंत्री व पोलीस अधीक्षक साहेब पालघर, आणि निरीक्षक साहेब कासा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी, कलर्स टीव्ही मालिका द्वारे भारती सिंग हिने विनोद करण्याबद्दल आदिवासी समाजाचे लज्जास्पद वर्तन केले असता, संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्मितेचा अपमान व अनादर करून आदिवासी समाजाच्या भावना दुखवून चॅनेलचे माध्यमातून प्रसारित करून अपमान केला आहे. त्यामुळे  भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी व शेतमजूर संघटनेचे संस्थापक संतोषराव मेश्राम व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष द्रौपदी जगने ( रजनीताई ) आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक अध्यक्ष अजय गवई यांच्या द्वारा आदिवासी समाज शेतकरी समाजाची मागणी आहे की, कलर्स एचडी चॅनेल त्वरित बंद करण्यात यावे व भारती सिंग व तसेच कार्यक्रम निर्माता व इतर कलाकारांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाजाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अन्यथा आदिवासी समाज शेतकरी आघाडी वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये, अनेक राज्यात, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आदिवासी समाज शेतकरी आघाडी अजय सखाराम तुंबडा महाराष्ट्र प्रदेश महासचिव, चिंतामण सावर, कमलेश भुसारा, दशरथ दळवी, संतोष भुसारा, विलास मेघवाले यावेळी उपस्थित होते. यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून असा इशारा आदिवासी समाजाने दिलेला आहे.

विठ्ठल ठाकरे

नागपूर

जिल्हा प्रतिनिधी

9850310282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *