लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
Summary
मुंबई, दि. २३ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. यानिमित्ताने मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क […]
मुंबई, दि. २३ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
यानिमित्ताने मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. त्यांनी ब्रिटिशांच्या अराजकाला वाणी आणि लेखणीने कडाडून विरोध केला. लोकमान्य टिळक खडतर परिस्थितीतही आव्हानांवर मात करण्याच्या धीरोदात्ततेची प्रेरणा देतात. तत्त्वचिंतक, प्रखर पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.