BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

लॉकडाउनचा होत आहे निषेध. घरात ठेऊन जनतेला उपाशी मारणार ❓❓

Summary

गडचिरोली प्रतिनिधी :- देशभरात शेतकऱ्यांचे न्याय हक्क आणि आपल्या संविधानिक अधिकारासाठी, कृषी विषयक केंद्र शासनाच्या अन्याकारक निर्णयाच्या विरोधात देशभरात आंदोलन तीव्र होत आहे. इंधन दरवाढी विरोधात आंदोलने होण्याची शक्यता आहे. आर्थिक बजेटची चर्चा करायची नाही. खाजगीकरण करण्याचे अजून शासनाला मोठे […]

गडचिरोली प्रतिनिधी :-
देशभरात शेतकऱ्यांचे न्याय हक्क आणि आपल्या संविधानिक अधिकारासाठी, कृषी विषयक केंद्र शासनाच्या अन्याकारक निर्णयाच्या विरोधात देशभरात आंदोलन तीव्र होत आहे. इंधन दरवाढी विरोधात आंदोलने होण्याची शक्यता आहे. आर्थिक बजेटची चर्चा करायची नाही. खाजगीकरण करण्याचे अजून शासनाला मोठे निर्णय घ्यायचे आहेत. मागच्या कडक लॉकडाउन घेतले तसे…. केंद्र सरकार आणि राज्य शासन संगनमताने हे सर्व करत आहे. लॉकडाउन केला की मास्क लावून आपली तोंड बंद होतात,आंदोलने तर लांबची गोष्ट आहे. सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष, नेते, भांडवलदार, मनुवादी हे सर्व एक आहेत आणि यांची पाॅलिसी पण एक आहे .ती म्हणजे जनतेची पिळवणूक करून, गुलाम बनवून, मूर्खात काढून त्यांच्यावर राज्य करायचं। मात्र संविधान जनतेच्या बाजूने आहे, बाबासाहेबांची घटना फक्त जनतेला न्याय देऊ शकते पण त्याविषयी मनुवादी विचारांच्या सत्ता स्थापन करण्याऱ्यांनी गैरसमज पसरविले आहेत. धर्माच्या नावाखाली विषमता निर्माण करून जनतेला एकमेकात लढविल्या जात आहे, हेतु साध्य करण्यासाठी संविधान अंमलात आणलं जात नाही. संविधान प्रजासत्ताक आहे. याना प्रजेची सत्ता नको,???लोकशाही नको आहे। संविधानाला डावलून सर्व चालू केलं आहे सरकारने??लॉकडाउन करून संविधानाची छेडछाड होत आहे.लॉकलाउन मुळे जनजीवन विस्कळीत होत आहे, कोरोनाच्या नावाखाली लोकांना भयभीत करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे लॉकडाउनचा तीव्र विरोध होत आहे. “” पण घरात बसून उपाशी पोटी जनता मरनार नाही का””? म्हणून दोन्ही सरकारचा जाहीर निषेधही होत आहे.. शासनाने संविधानातील मूलभूत अधिकाराच्या कलमाचे भान ठेवून जबाबदारीने योग्य काळजी घ्यावी आणि तसे काम करून दाखवावे. विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन तीव्र होत आहे. डॉ.बाबासाहेबांची राज्यघटनाच फक्त जनतेला न्याय देऊ शकते.

चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *