भंडारा महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

लाखांदूर पं स वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ▪ सभापतीपदी पुरुषोत्तम ठाकरे तर ऊपसभापदी वरखडे यांची निवड

Summary

लाखांदूर : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत सभापती उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये भाजपाचे पुरुषोत्तम बक्षी ठाकरे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना संजय वरखडे यांची भाजप समर्थनात निवड करण्यात आल्याने लाखांदूर पंचायत समितीवर भारतीय […]

लाखांदूर :
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत सभापती उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये भाजपाचे पुरुषोत्तम बक्षी ठाकरे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना संजय वरखडे यांची भाजप समर्थनात निवड करण्यात आल्याने लाखांदूर पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, १२ सदस्यीय लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान स्थानिक पंचायत समिती सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक लाखांदूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षित करण्यात आले होते. आज झालेल्या विशेष सभेत काँग्रेस कडून मंगेश राऊत तर भाजपाकडून पुरुषोत्तम ठाकरे यांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत पुरुषोत्तम ठाकरे यांना ७ मते पडली तर मंगेश राऊत यांना ४ मते पडली. एकंदरीतच सभापती म्हणून पुरुषोत्तम ठाकरे यांची निवड झाली.
तथापि, उपसभापती पदासाठी सभागृहात उपस्थित ११ सदस्यांमधून काँग्रेस गटा अंतर्गत अमृता निलेश ठाकरे यांनी अर्ज दाखल केला होता तर भाजपा समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत संजना संजय वरखडे यांनी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, यावेळी उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सभागृहात उपस्थित सदस्यांच्या संमतीने उपसभापती पदासाठी दाखल २ भिन्न उमेदवारांना हात उंचावून मतदान घेण्यात आले.
यावेळी काँग्रेस गटा अंतर्गत अमृता ठाकरे यांना ५ मते पडली तर भाजपा समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना वरखडे यांना अधिकतम ६ मते पडल्याने संबंधितांची उपसभापती म्हणून घोषणा करण्यात आली. या निवडणूक प्रक्रिया दरम्यान लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार, पंचायत समितीचे बिडिओ मार्तंड खुणेे, विस्तार अधिकारी पंकज डुंभरे आदींनी कामकाज पार पाडले.
दरम्यान, स्थानिक लाखांदूर पंचायत समितीवर भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा अंतर्गत नवनियुक्त सभापती तसेच ऊपसभापती यांच्या नियुक्तीबद्दल भाजपाचे निरीक्षक डॉ नेपाल रंगारी, जि प सदस्य प्रतिक ऊईके, अविनाश ब्राम्हणकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान, राकॉ तालुकाध्यक्ष बालु चुन्ने, माजी ऊपसभापती शिवाजी देशकर, तुळशिदास बुरडे, न पं चे अध्यक्ष विनोद ठाकरे, रिजवान पठण, राहुल कोटरंगे, शहर अध्यक्ष कांचन गहाणे, सरपंच राकेश चुटे, धनराज राऊत, डेलीस ठाकरे यांसह शेकडो राकॉ भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

बॉक्स :
१२ सदस्यांपैकी १ सदस्य होते गैरहजर
लाखांदूर पंचायत समितीमध्ये १२ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी सभापती व उपसभापती निवडीच्या झालेल्या विशेष सभेत १२ पैकी केवळ ११ सदस्यच उपस्थित होते. गैरहजर असलेले महिला सदस्य निमा ठाकरे हे यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती होते. विशेष म्हणजे यापूर्वी पंचायत समितीचे सभापती असलेले संजना वरकडे यांची आता उपसभापती म्हणून निवड झाली आहे. एकंदरीतच यापूर्वी पंचायत समितीच्या उपसभापती असलेल्या महिला सदस्य कोणत्या कारणामुळे विशेष सभेला गैरहजर होत्या याची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *