राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २४ जुनला राज्यभर जिल्हा/तालुका कचेरी समोर निदर्शने

गडचिरोली :राष्ट्रीय ओबीसी महासंघाची (दि.१५ जुन) ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली झूम ऐप द्वारे सर्व शाखांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासन जाणिव पूर्वक ओबीसींचे प्रश्न सोडवित नाही. निवडणूकीआधी ओबीसींची जातनिहाय जनगणना करु असे केन्द्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते मात्र आता गृहराज्यमंत्री किशन रेडी यांनी जातनिहाय जनगणना होणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी ठाम भुमिका या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आली. यानिमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे २४ जुनला राज्यभर जिल्हाकचेरी समोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा, दिनांक 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयावर विचार विनिमय करा, क्रिमीलयेरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने येणाऱ्या अडचणी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळण्याबाबत, आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा, ओबीसींचा बॅकलॉग त्वरित भरण्यात यावा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोगाचा विचार करुन नवीन आयोग तयार करावा, आदी मागण्यांवर चर्चा झाली.
प्रस्तावित सचिन राजूरकर, संचालन प्रा. शरद वानखेडे, आभार शकील पटेल यांनी केले.