क्राइम न्यूज़ देश हेडलाइन

राम जन्मभूमी ट्रस्टला अज्ञात भामट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांना घातला गंडा.

Summary

अयोध्या : ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या कामाला जोर आलाय. याच दरम्यान, भाविकांना धक्का देणारी एक गोष्ट घडलीय. राम मंदिर निर्माणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या राम जन्मभूमी ट्रस्टला अज्ञात भामट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांना गंडा […]

अयोध्या : ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या कामाला जोर आलाय. याच दरम्यान, भाविकांना धक्का देणारी एक गोष्ट घडलीय. राम मंदिर निर्माणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या राम जन्मभूमी ट्रस्टला अज्ञात भामट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातलाय.

राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका अकाऊंटमधून बनावट चेकद्वारे सहा लाखांची रक्कम काढण्यात आलीय. ट्रस्टकडे जमा झालेल्या याच फंडमधून राम मंदिर निर्माणाचं काम करण्यात येतंय. मंदिराची जबाबदारी हाताळणारे राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी यासंबंधात अयोध्या पोलिसांत एक एफआयआर दाखल केलीय. ट्रस्टच्या एका अकाऊंटमधून खोट्या चेक आणि खोट्या सहीद्वारे सहा लाखांची रक्कम काढल्याची तक्रार त्यांनी दाखल केलीय.
बँकेतून आपल्याला यासंबंधी विचारणा करणारा एक कॉल आल्यानंतर याचा पत्ता लागल्याचंही चंपत राय यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटलंय. चेकवर ट्रस्टीच्या सह्याही खोट्या असल्याचं समजतंय. अयोध्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतलीय. पुढचा तपास सुरू आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाच्या पक्षात निर्णय देताना राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टला याची जबाबदारी सोपवली होती. यंदा ५ ऑगस्ट रोजी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहीत अनेक मोठे नेते आणि धार्मिक समुदायाचे लोक उपस्थित झाले होते. करोनाचं सावट असताना हा सोहळा पार पडला होता. भूमिपूजन सोहळ्यानंतर राम जन्मभूमी मंदिर निर्माणाच्या कामाला सुरूवात झाल्याचंही ट्रस्टकडून सांगण्यात आलं होतं.

हे मंदिर उभारण्यासाठी ३६ – ४० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. भूकंप आणि इतर धोक्यांमुळे मंदिराला हानी पोहचू नये यासाठी भारताच्या प्राचीन निर्माण पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम केलं जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *