राज्यसरकारचा १५ टक्के वाढीचा निर्णय
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर :- राज्यातील महानगरपालिकांमधील सध्याच्या नगरसेवक संख्येच्या १५ टक्के नगरसेवक वाढविण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या १० ने वाढणार आहे. सद्यस्थितीत या महानगरपालिकेत ६६ नगरसेवक असून, आगामी निवडणुकीत […]
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर :- राज्यातील महानगरपालिकांमधील सध्याच्या नगरसेवक संख्येच्या १५ टक्के नगरसेवक वाढविण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या १० ने वाढणार आहे. सद्यस्थितीत या महानगरपालिकेत ६६ नगरसेवक असून, आगामी निवडणुकीत ही संख्या ७६ वर जाणार आहे. मागील दहा वर्षांत सर्वच शहरातील लोकसंख्या बऱ्यापैकी वाढली आहे. महानगरपालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या पाहता प्रभागाची संख्या वाढवून नगरसेवकांची ही संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सद्यस्थितीत ६६ नगरसेवक आहेत. १५ टक्के वाढ केली जाणार असल्याने १० नगरसेवक वाढणार असून, आता २५ प्रभाग होती. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहराची हद्दवाढ करण्यात आलेली नाही. हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे धुळखात पडला आहे. राजकीय इच्छाशक्ती कमी पडल असल्याने हद्दवाढीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही. आघाडी सरकार, युती सरकार त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार आले. पण हद्दवाढीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. सन २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४ सदस्यीस प्रभाग रचना होती. ती आता तीन सदस्यीय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग तुटणार आहे. नव्या प्रभाग रचनेत कोणाचा कसा बळी जाईल, हेसध्या तरी सांगणे कठीण आहे. दरम्यान, १० नगरसेवक वाढणार असल्याने सर्व राजकीय पक्षांसाठी हा शुभ संकेत मानला जात आहे.