राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने जखमी खेळाडूला महावितरण कडून मिळाली मदत
प्रतिनिधी :-(फुलंब्री दि.5, येथील रहिवासी अरबाज फरजून पटेल या युवकास 7 जुलै 2019 रोजी क्रिकेट खेळत असताना महावितरणच्या 11 केवी या उच्चदाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागला होता. यामुळे या युवकास अपंगत्व आले. सदरील युवकास नुकसान भरपाई मिळावी यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महावितरण विभागाकडे याबाबत पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत सूचित केले होते. आज ( दि.5 ) रोजी अखेर या युवकास महावितरण च्या वतीने 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. मिळालेल्या मदती बद्दल अरबाज च्या कुटुंबियांनी ना. अब्दुल सत्तार तसेच महावितरण विभागाचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे ,जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, नगरपंचायत चे गटनेता अब्दुल रऊफ कुरैशी, रमेश दुतोंडे ,जमीर पठाण ,न,प, सभापति मुदस्सीर पटेल, संजय प्रधान, इरफान खान ,अजय जैसवाल ,कैलास राऊत, मुंतजीब काझी आदिंची उपस्थिती होती.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
मराठवाडा
प्रतिनिधी
शेख चांद