रंगभूमी, चित्रपट सृष्टीने मार्गदर्शक, चतुरस्र अभिनेता गमावला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि. ६ :- मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी […]
मुंबई, दि. ६ :- मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांपैकी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे होते. करारी चेहरा, बुलंद आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व यातून मोघे यांनी अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या. वैविध्यपूर्ण अशा भूमिका ताकदीने निभावतानाच त्यांनी माणूस म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली.या दोन्ही क्षेत्रांतील नव्या पिढीसमोर त्यांनी आपल्या अभिनयाचा आदर्श ठेवला.
ते दिलखुलास होते. परखड मतांचे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे कलावंत होते. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला एक चतुरस्र अभिनेता आणि मार्गदर्शकाची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491