युवा चेतना मंच व्दारे कोरोना लसीकरणास पटनाट्याने जनजागृती मा योगेश कुंभेजकर सी ई ओ हयानी लसी करण करण्याचे केले ग्रामस्थाना आवाहन.
नागपूर- पारशिवनी तालुक्यात लसीक रणा गती देण्याकरिता आदीवासी अती दुर्गम भागाती ल ग्रा प कोलीतमारा अंतर्गत घाटपेंढरी येथे युवा चेतना मंच व पंचायत समिती पारशिवनी मार्फत तयार केले ल्या कलापथकाने पथनाटय सादर करून लसीकरण करण्याकरिता गावकरी नागरिकात जनजागृती करण्या त आली.
कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणुन पारशिवनी तालुक्यात ४५ + वयोगट नागरिकांचे लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या अनुषंगाने मा योगे श कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नागपुर हयांनी पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत आदिवासीं अती दुर्गम भागातील ग्राम पंचायत कोलीतमारा अंतर्ग त घाटपेंढरी येथे भेट देऊन क्षेत्रीय स्तरावरील कार्यरत कर्मचारी यांना मार्गदर्शनपर प्रबोधन करून त्यांना युवा चेतना मंच व पंचायत समिती कार्यालय मार्फत तयार केलेल्या कलापथकाने लोकांचे लसीकरण वाढविण्या करिता पथनाट्य सादर करून गावक-यात जनजागृती करण्यात आली. तदंतर गावातील सभेनंतर ग्रामस्थांशी संवाद साधुन लसीकरणा बाबतचे गैरसमज दुर करण्या त आले. तसेच गावातील सर्व नागरिकांना लसीकरण बाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नागपुर हयां नी आवाहन केले. आणि लस घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणुन घेतल्या. तसेच घाटपेंढरी अंतर्गत सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रच्या कामाची पाह णी करित काम तातडीने पुर्ण करण्यास सुचना दिल्या. सदर भेटी दरम्यान मा. अनिल किटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), मा. डॉ. सायरे सर सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि प नागपुर, मा. अशोक खाडे गटविकास अधिकारी, श्री आशिष रावळे जिल्हा समन्वयक, डॉ. प्रशांत वाघ तालुका आरोग्य अधिकारी, श्री विजय नाईक विस्तार अधिकारी पंचायत, मुनेश दुपारे समन्वयक, श्री अरुण बांबल, श्री रमेश ठोंबरे, सचिन देशमुख ग्रामसेवक, कलीराम उईके ग्रा पं सरपं च , डॉ. शेंडे सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी सह इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.