महाराष्ट्र हेडलाइन

मोदीं सरकारच्या दोन मोठ्या घोषणा पहिली : 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आता केंद्र देणार मोफत लस दुसरी : 80 कोटी गरीबांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य या लढाईमध्ये सर्वात प्रभावी हत्यार कोविड प्रोटोकॉल चे पालन करण्याचे आवाहन

Summary

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करत आहेत. 15 महिन्यांच्या कोरोना कालावधीत हा त्यांचा 9 वा संदेश आहे. यामध्ये ते म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट आणि याच्यासोबत आपला लढा सुरू आहे. जगातील बर्‍याच देशांप्रमाणे या लढ्यादरम्यान भारतही […]

नवी दिल्ली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करत आहेत. 15 महिन्यांच्या कोरोना कालावधीत हा त्यांचा 9 वा संदेश आहे. यामध्ये ते म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट आणि याच्यासोबत आपला लढा सुरू आहे. जगातील बर्‍याच देशांप्रमाणे या लढ्यादरम्यान भारतही मोठ्या वेदनांनी ग्रस्त आहे. आपल्यातील बर्‍याच जणांनी आपले नातेवाईक आणि ओळखीचे लोक गमावले आहेत. अशा सर्व कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. हा गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी आहे. आधुनिक जगाने असा साथीचा रोग कधी पाहिलेला किंवा अनुभवला नव्हता.
मोदी म्हणाले की इतक्या मोठ्या जागतिक महामारीमध्ये आपला देश बर्‍याच गोष्टींसोबत एकत्र लढा देत आहे. कोविड हॉस्पिटल बनवण्यापासून आयसीयू बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर बनवण्यापासून ते चाचणी प्रयोगशाळेचे जाळे तयार करण्यापर्यंत अनेक कामे देशाने केली आहेत. गेल्या दीड वर्षात देशात नवीन आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

मोदींच्या संबोधनातील महत्त्वाच्या गोष्टी

1. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस
एक चांगली गोष्ट म्हणजे, राज्य पुनर्विचाराच्या मागणीसह पुन्हा पुढे आले. राज्यांच्या या मागणीवर आम्हीही विचार केला की, देश वासियांना त्रास होऊ नये. योग्य पध्दतीने लसीकरण व्हावे. यासाठी 16 जानेवारी ते एप्रिल अखेरची यंत्रणा पुन्हा लागू करावी. आज हा निर्णय घेण्यात आला आहे की लसीकरणाशी संबंधित 25% कामांची जबाबदारी भारत सरकार घेईल. दोन आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल.
केंद्र व राज्य सरकार एकत्रित नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. योगायोग म्हणजे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन देखील आहे. सोमवार, 21 जूनपासून भारत सरकार देशातील प्रत्येक राज्यात 18 वर्षांवरील लोकांना राज्यांना मोफत लस उपलब्ध करुन दिली जाईल. व्हॅक्सीन निर्मात्यांकडून एकूण उत्पादनाचा 75% भाग स्वतः खरेदी करुन राज्य सरकारला मोफत देईल. कोणत्याही राज्य सरकारला लसींसाठी काहीच खर्च करावा लागणार नाही.

2. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य
लसीकरणाशिवाय मला आज आणखी एक मोठा निर्णय देशवासियांना सांगायचा आहे. गेल्या वर्षी लॉकडाउन लावावे लागले होते तेव्हा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 80 कोटी देशवासियांना 8 महिन्यांसाठी मोफत रेशन देण्यात आले होते. दुसर्‍या लाटेमुळे ही योजना मे आणि जूनमध्येही वाढवण्यात आली. आज सरकारने निर्णय घेतला आहे की ही योजना आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येईल. सरकार गरीबांच्या प्रत्येक गरजेसह त्यांचा सोबती बनले आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी गरीबांना निश्चित प्रमाणात मोफत धान्य दिले जाईल. माझ्या गरीब भाऊ-बहिणींपैकी कुणीही कुणालाही उपाशी झोपावे लागू नये.
3. या लढाईमध्ये सर्वात प्रभावी हत्यार कोविड प्रोटोकॉल
एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजनची मागणी नकळत वाढली. एवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भारतात कधीच जाणवत नव्हती. ही गरज भागवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. सरकारच्या सर्व यंत्रणांनी काम केले. ऑक्सिजन रेल्वे, हवाई दल, नौदलाचा आधार घेतला. द्रव ऑक्सिजनच्या उत्पादनात 10 पट वाढ फारच कमी वेळात प्राप्त झाली.
जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जे उपलब्ध होऊ शकत होते, ते आणण्यात आले. आवश्यक औषधांचे प्रोडक्शन अनेक पटींनी वाढवण्यात आले. परदेशात जेथे औषधे उपलब्ध आहेत, तेथून आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली गेली नाही. कोरोनासारख्या अदृश्य आणि रुप बदलणाऱ्या शत्रूविरूद्धच्या लढाईत सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल आहे. मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर सावधगिरी बाळगली जावी.

4. लस सुरक्षा कवच प्रमाणे
लस ही लढाईत सुरक्षा कवचप्रमाणे आहे. जगभरात व्हॅक्सीन बनवणाऱ्या कंपन्या निवडक आहेत. आता आपल्याकडे भारतात लस तयार केली नसती तर भारतासारख्या विशाल देशाचे काय झाले असते. गेल्या 50-60 वर्षांच्या इतिहासाकडे आपण पाहिले तर हे लक्षात येईल की परदेशातून लस घेण्यासाठी भारताला अनेक दशके लागत होते. लसीचे काम पूर्ण होत असे, तरीही आपल्या देशात लसीकरणाचे काम सुरू होऊ शकत नव्हते. पोलिओ, स्मॉल पॉक्स, हिपॅटायटीस बी या लसीसाठी देशवासीयांनी अनेक दशके वाट पाहिली होती.
5. लसीकरणासाठी मिशन मोडमध्ये काम
2014 मध्ये जेव्हा देशवासीयांनी आम्हाला सेवा देण्याची संधी दिली तेव्हा भारतात लसीकरणाचे व्याप्ती केवळ 60% च्या जवळपास होती. आमच्या मते ही चिंतेची बाब होती. ज्या वेगाने भारतात लसीकरण कार्यक्रम सुरू होता, त्या वेगाने देशाला शंभर टक्के लसीकरण कव्हरेज करण्यात 40 वर्षे लागली असती. आम्ही ही समस्या दूर करण्यासाठी मिशन इंद्रधनुष लॉन्च केले. आम्ही ठरवले की, या मिशनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर लसीकरण केले जाईल आणि देशात ज्याला लसीकरणाची गरज आहे, त्यांना लसी देण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्ही मिशन मोडमध्ये काम केले.
6. आपण पुढे जात होतो पण कोरोनाने घेरले
आपण 5-7 वर्षात लसीकरण कव्हरेज 60% ने वाढवून 90% पर्यंत वाढवले. आपण लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती दोन्हीही वाढवले. मुलांना अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी अनेक लसींना अभियानाचा भाग बनवले. आपल्याला आपल्या देशातील बालकांची चिंता होती. गरीबांची चिंता होती, गरीबांच्या मुलांची चिंता होती, ज्यांना कधीच लस देण्यात आलेली नव्हती. आपण योग्यरित्या पुढे जात होतो, पण कोरोना व्हायरसने आपल्याला घेरले.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वाचवण्यात भारत कसा सक्षम होईल याविषयी केवळ देशच नाही, तर जगालाही चिंता होती. जेव्हा हेतू स्पष्ट असेल, धोरण स्पष्ट असेल आणि सतत कठोर परिश्रम केले जातील, तेव्हा निकाल देखील चांगले प्राप्त होतो. प्रत्येक शंका बाजूला ठेवून, भारताने एका वर्षात एक नव्हे तर दोन मेड इन इंडिया लस लॉन्च केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *