मुलींमध्ये आरोग्यविषयक माहितीच्या अभावामुळे लग्नापूर्वीच गरोदरपणाचे प्रमाणात वाढ??
Summary
मुंबई – चक्रधर मेश्राम प्रतिनिधी दि. २० मार्च २०२१ किशोरवयीन मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेकविध योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे सुरू केले असले तरी राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम, डोंगराळ भागातील आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये तीनतेरा वाजले असल्याने किशोरवयीन मुलींमध्ये […]
मुंबई – चक्रधर मेश्राम प्रतिनिधी दि. २० मार्च २०२१
किशोरवयीन मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेकविध योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे सुरू केले असले तरी राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम, डोंगराळ भागातील आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये तीनतेरा वाजले असल्याने किशोरवयीन मुलींमध्ये लग्नापूर्वीच गरोदरपणाचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. १० ते १९ वर्षे असलेल्या कोणत्याही किशोरवयीन मुला- मुलींच्या शरिरात बदल होण्यास सुरुवात होते.. विशेष म्हणजे मुलींना मासिक पाळी सुरू होत असल्याने आरोग्य विषयक काळजी घेणे आवश्यक आहे. या वयात मुलांना आणि मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाढले असते. या वयात विशेष काळजी घेतली जावी म्हणून शासनाने शालेय स्तरावर उपक्रम राबविले आहेत. तरीही राज्यातील अनेक ठिकाणी शालेय स्तरावर योग्य रितीने अंमलबजावणी केली जात नाही.. त्यामुळे आजही कित्येक ठिकाणी लग्नाच्या आधीच गरोदरपणाचे प्रमाणात वाढ झाली आहे. याचे गंभीर परिणाम मुलींना आणि पालकांनाही भोगावे लागले आहेत. काही समाजात मुलगा झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा असल्याने अल्पवयीन मुला- मुलींना आवडते ठिकाणी एकमेकांशी संबंध होतील अशा ठिकाणी ठेवले जाते. अशा वेळी ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहून कायद्याच्या कचाट्यात सापडते. शासनाने मासिक पाळी संवधऀन हा उपक्रम सुरू केले आहे. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ८2 हजार मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम कमी वयातच लग्न करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मुलगी १८ वर्षे अगोदर गरोदर राहण्याच्या अनेक केसेस पाहायला मिळतात. अशा वेळी नाहक मुलांना कारागृहात बंदी घालण्यात येते. तर मुलींना बालसुधार गृहात ठेवले जाते. असे मत राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक विशाखा काटवले यांनी व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील तालुका स्तरावर मैत्री क्लिनिक स्थापन केली आहेत. किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काही गावात पिअर एज्युकेटर ची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील संस्कृती अतिशय बंदिस्त असल्याने अल्पवयीन मुलीवर कौटुंबिक अन्याय होत आहे.