मनोरंजन महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

“मुगले आझम दोनदा पाहिला” : राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

Summary

मुंबई, दि. 7 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा मुगले आझम […]

मुंबई, दि. 7 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा मुगले आझम मला इतका आवडला की मी लगोलग दोन वेळा पाहिला. परंतु त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही, आणि मुगले आझम मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.

भारतीय चित्रपट सृष्टी आज जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या यशाचे शिल्पकार जसे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार व गायक आहे, तसेच दिलीप कुमार यांच्यासारखे सशक्त अभिनेते होते. दिलीप कुमार हे एक महान अभिनेते होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझ्याकरिता ते महानायक होते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या पत्नी सायरा बानो व त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *