माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसचा कोकणातील चेहरा हरपला ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Summary
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा कोकणातील चेहरा हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाने […]
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा कोकणातील चेहरा हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. ते एक उत्तम संघटक होते, कुशल वक्ते होते, लोकांच्या प्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. कोकणच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. माणिकराव जगताप माझे निकटचे सहकारी होते. त्यांच्या रूपात माझा एक बंधुतुल्य मित्र निघून गेला, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी जगताप यांच्या निधनावर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.