BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

महाविकास आघाडीतील परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ??

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 1 जून 2021:- निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, बदलीसाठी, तसेच इतर व्यवहारात […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 1 जून 2021:-
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, बदलीसाठी, तसेच इतर व्यवहारात आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.
या विषयानंतर जोरदार राजकारण पेटले असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली असून “निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तक्रारदार गजेंद्र पाटील हे चौकशीत सहकार्य करीत नसून, त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याने हे प्रकरण पंचवटी पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *