महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र शासन जनतेची फसवणूक करित आहे . योगेश बन यांचा आरोप

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ८ एप्रील २०२१ राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण आपल्या परिचयातील वा घरातील व्यक्ती सर्दी/खोकला/ताप मुळे अँटिजेन/आर टी -पी सी आर मध्ये कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले परंतु ज्या ठिकाणी […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ८ एप्रील २०२१
राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण आपल्या परिचयातील वा घरातील व्यक्ती सर्दी/खोकला/ताप मुळे अँटिजेन/आर टी -पी सी आर मध्ये कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले परंतु ज्या ठिकाणी निवडणूक आहेत तिथे रुग्ण का नाही असा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. शासन कडक निर्बंध लावून संचार/जमाव करण्यास बंदी घालत आहे. सोबतच निर्बंध मोडणाऱ्या व्यक्तीकडून आर्थिक स्वरूपात सक्तीची वसुली करत आहेत. ज्यांच्याकडून वसुली होऊ शकत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत . सोबतच पोलिसांमार्फत चोप देण्यात येत आहे. सामान्य नागरिक अतिशय हतबल होऊन नैराश्य अवस्थेत गेला आहे. शासनातर्फे निर्बंध करत असतांना लॉकडाऊन/मिनी लॉकडाऊन च्या नावाने काही वेळेसाठी व्यावसायिकांना शिथिलता प्रदान करत आहे परंतु तिथेच शासन जनतेची व स्वतःची फसवणूक करत आहेत. अल्पकालावधी मध्ये मिळालेली सूट व्यावसायिकांना व ग्राहकांना गर्दीचा विचार न करायला लावणारी असते परंतु त्याऐवजी व्यावसायिक व सामान्य जनतेला दुकान 24 तास सुरू राहतील असा दिलासा दिला तर नक्कीच ग्राहक व दुकानदार गर्दी होऊ देणार नाही. म्हणून सरकारने लावलेले निर्बंध हे सामान्य जनतेच्या आयुष्याशी खेळण्यासाठी केलेले आहेत असा स्पष्ट आरोप आहे. खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण ठेवण्यासाठी बेड उपलब्ध नाही व कुठेतरी उपलब्ध झालाच तर वाढीव किंमत घेऊन बाजार मांडला आहे. आजपर्यंत अनेक महामाऱ्या देशात आल्या होत्या व आहेत परंतु सगळ्यात जास्त जनतेची पिळवणूक व फसवणूक आताच्या केंद्र व राज्य सरकारने केली आहे. कोरोना या आजारावर अधिकृत कुठलेही औषध अथवा ईलाज नाही तसेच प्रत्येक नागरिक आपल्या परिवाराची काळजी याकडे प्राधान्य देतो त्यामुळे सत्ताधारी यांच्या विरोधात जाहीर बंड करू शकत नसल्याचा फायदा सत्ताधारी घेत आहेत. मागील वर्षभराच्या काळातील अनुभव बघता पुढील 20 ते 25 वर्ष आपण कुठल्याही प्रकारची योग्य उपाययोजना करू शकाल असं वाटत नाही. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी किमान जनहिताच्या दृष्टीने स्वयंपक्ष करत असलेल्या फसवणुकीचे बळी पडू नये आणि सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कासाठी व उपजीविकेचे साधन सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारला इशारा दिला पाहिजे. सामान्य नागरिक झालेल्या त्रासाला कदापि विसरू शकणार नाही परंतु भविष्यातील आपली खुर्ची सत्ताधाऱ्यांना पुन्हा मिळेल याची शंका वाटते..योगेश गुलाबराव बन,वंचित बहुजन आघाडी,जिल्हाध्यक्ष – औरंगाबाद पश्चिम यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *