महाराष्ट्रातील भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
Summary
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्रातील भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री.भिकुजी (दादा) इदाते यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत योजनांचा आढावा घेतला. राज्य भटके विमुक्त समुदायांचे हाऊस होल्ड सर्वेक्षण करण्याबाबत राज्याच्या भटके विमुक्तांच्या […]
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्रातील भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री.भिकुजी (दादा) इदाते यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत योजनांचा आढावा घेतला.
राज्य भटके विमुक्त समुदायांचे हाऊस होल्ड सर्वेक्षण करण्याबाबत राज्याच्या भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, सर्वेक्षण करण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याबाबत, राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या बोर्डाला पाठवावा याबाबत यावेळी चर्चा झाली. या सर्वेक्षणाचा खर्च भारत सरकारद्वारे दिला जाईल. बोर्डाच्यावतीने याबाबत पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बोर्डाचे सीईओ सी. एस. वर्मा, अध्यक्षांचे खाजगी सचिव डॉ. मनीष गवई, भटक्या विमुक्तांचे प्रतिनिधी राजेंद्र भोसले उपस्थित होते.