नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराणा लाईव स्टॉक गोट फार्म मधून ग्राइंडर मशिनीने कुलूप कापून 30 शेळ्यांची चोरी कोंढाळी काटोल रोडवरील शेळी फार्म येथील घटना

Summary

काटोल/कोंढाळी-वार्ताहर येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराणा लाईव स्टॉक गोट फार्ममध्ये 08 मे रोजी रात्री शेळी चोरांच्या टोळीने ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने फार्म हाऊसचे कुलूप तोडून 30 शेळ्या चोरून नेल्याची फिर्याद विशाल सिंग व्यास यांनी दिली आहे 08 मे रोजी महाराणा […]

काटोल/कोंढाळी-वार्ताहर

येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराणा लाईव स्टॉक गोट फार्ममध्ये 08 मे रोजी रात्री शेळी चोरांच्या टोळीने ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने फार्म हाऊसचे कुलूप तोडून 30 शेळ्या चोरून नेल्याची फिर्याद विशाल सिंग व्यास यांनी दिली आहे 08 मे रोजी महाराणा लाईव स्टॉक गोट फार्मचे संचालक विशाल व्यास यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळी येथील रहिवासी विशालसिंग सुरेंद्रसिंग व्यास (35) यांनी एम बी ए पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेळीपालनाचा व्यवसाय निवडला.
गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी शेतीसोबतच कोंढाळी – काटोल राज्यमार्ग 247 वर कोंढाळीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर महाराणा लाईव स्टॉक नावाच्या शेळी फार्मवर शेळीपालनाचा व्यवसायही सुरू केला आहे. त्यांच्या शेळी फार्मवर शेळ्या आणि बोकड मिळून एकूण 150 लहान मोठ्या शेळ्या होत्या.
नित्याप्रमाणे सर्व शेळ्या आणि बोकड गोट फार्म होते चोरट्यांनी आठ मे चे रात्री गोट फार्मचे कुलूप ग्राइंडर मशीनने कापून गोट फार्म मधिल
तीन मोठ्या (ब्रिडिंग चे) बोकड, 07 मोठ्या शेळ्या आणि एक वर्ष वयोगटातील 20 शेळ्या अशा एकूण 30 शेळ्या चोरट्यांनी 08 मे च्या रात्री चोरून नेल्या.
या शेळ्या चोरीची फिर्याद विशालसिंग व्यास यांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात दिली आहे. 30 शेळ्यांची बाजारातील किंमत 3 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
बकऱ्या चोरीची तक्रार मिळताच कोंढाळी पोलीस स्टेशन चे राजकुमार त्रिपाठी, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक भोजराज तांदूळकर अन्य शिपायांसह यांनी तात्काळ महाराणा लाईव स्टॉक गोट फार्म गाठून घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात बकरी चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून, चोरी च्या तपास कामी रवाना झाले यात राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *