BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

भारतातील जिवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी N.I.C.E. ने थेट मोदींना लिहिले खुले पत्र.

Summary

मुंबई प्रतिनिधी:-भारतात गेल्या वर्षभरात कोविड-19 या रोगाविषयी समाज माध्यमामध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक देशभक्त डॉक्टर्स , पत्रकार , स्वयंसेवक व सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्न करीत आहेत .सरकार कडून व मीडिया मार्फत सतत कोरोना ही एक महामारी असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार करण्याचा […]

मुंबई प्रतिनिधी:-भारतात गेल्या वर्षभरात कोविड-19 या रोगाविषयी समाज माध्यमामध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक देशभक्त डॉक्टर्स , पत्रकार , स्वयंसेवक व सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्न करीत आहेत .सरकार कडून व मीडिया मार्फत सतत कोरोना ही एक महामारी असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न होत आहे . या पार्श्वभूमीवर या जागतिक षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी देशातील NICE(Network of Influenza Care Experts) च्या 161 डॉक्टरांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून सरकारला जाब विचारला आहे .
या पत्रात त्यांनी सरकारला Novel Corona Virus मुळे मृत्यू झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे सांगून सरकारला ICMR(Indian Council of Medical Research) ने सर्व पेशंटच्या RT-PCR टेस्ट (positive किंवा negative) असल्या तरी प्रत्येक मृत्यूचे कारण -‘Death due to Novel Corona Virus ‘ हे लिहण्यास सांगणे कसे चुकीचे आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे .
पत्रात पुढे या डॉक्टरांनी सरकारला चुकीची माहिती पसरविणे , लोकांत भीती निर्माण करण्याचे थांबविणे तसेच लॉकडाऊन संपुष्टात आणून लसीकरण मोहीम थांबविण्याची व सर्वसामान्य परिस्थिती पुन्हा बहाल करण्याची विनंती केली आहे .या डॉक्टरांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ संदर्भ-पुरावे देखील सरकारला दिले आहेत .
या डॉक्टरांच्या टीम मध्ये डॉ बिश्वरूप चौधरी , डॉ अमरसिंह आझाद व त्यांचे सर्व सहकारी असे 161 देशभरातील डॉक्टर्स आहेत .देशातील नागरिकांच्या जीवितहानी व पुढील वित्तहानी टाळण्यासाठी या तमाम देशभक्त डॉक्टरांनी आता थेट मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक खुले पत्र पाठवून एक प्रकारे जाब विचारला आहे .त्या बद्दल या सर्व देशभक्त 161 डॉक्टरांचे भारतीय नागरिकांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *