भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्या प्रकरणी महापौर यांच्याशी सकारात्मक चर्चा – कृष्णा मसराम अ.भा.आ. विकास परिषद
Summary
चंद्रपूर : भगवान बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आला त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्याचे पडसाद विविध ठिकाणाहून उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पुतळ्याचे पुर्ववत स्थापना व्हावी याकरीता […]

चंद्रपूर : भगवान बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आला त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्याचे पडसाद विविध ठिकाणाहून उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पुतळ्याचे पुर्ववत स्थापना व्हावी याकरीता दि. १७ मार्च २०२१ ला आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, आयुक्त महानगरपालिका, महापौर, स्थायीसमिती सभापती, जिल्हा पोलीस अधिक्षक तथा आदिवासी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी आदिवासी समाजाचे नगर सेवक, समाजसेवक यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत ठरल्या प्रमाणे महानगरपालिकेने कार्यवाही करावयाची होती.
त्या बैठकीत पुतळा उभारणीकरीता येणाऱ्या तांत्रीक बाबी दूर करुन पुतळा पुर्ववत महानगरपालिके मार्फत सौदर्यीकरण करुन उभारण्यात यावा असे ठरविण्यात आले होते. परंतु लॉकडाऊन मध्ये कार्यवाही होण्यास वेळ लागल्यामुळे दि. १८/०६/२०२१ ला महापौर राखीताई कंचर्लावार यांचेशी भगवान बिरसा मुंडा पुतळा उभारण्याकरीता लागणाऱ्या जमिन हस्तांतरणाचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तात्काळ पाठवून जमिन हस्तांतरण कार्यवाही तात्काळ करावी. तसेच सोदर्यीकरण व पुतळा उभारण्याचे कामाला सुरूवात करावी. असे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शिष्टमंडळ भेटून महापौर यांचेशी चर्चा केली.
महापौर यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याची व महानगरपालिकेचा ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्याचे चर्च दरम्यान महापौर यांनी सांगितले. वरिल शिष्टमंडळात जिल्हा महासचिव कृष्णा मसराम, जिल्हा युवा अध्यक्ष धनराज कोवे, सामाजिक कार्यकर्ते भोला मडावी, डॉ. पंकज कुळसंगे, भैय्याजी उईके, शुभम मडावी इत्यादींची शिष्टमंडळात उपस्थिती होती.