BREAKING NEWS:
बुलडाणा महाराष्ट्र हेडलाइन

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी

Summary

बुलढाणा, दि. ४ : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले […]

बुलढाणा, दि. ४ : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) -8 हजार 218

प्रतापराव जाधव (शिवसेना) – 3 लाख 49 हजार 867

नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -3 लाख 20 हजार 388

असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – 6 हजार 153

मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – 5 हजार 258

माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 2 हजार 455

मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – 4 हजार 978

वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – 98 हजार 441

विकास नांदवे (भीम सेना) – 2 हजार 331

प्रा. सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – 1 हजार 511

संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – 2 हजार 530

अशोक हिवाळे (अपक्ष) – 15 हजार 436

उध्दव आटोळे (अपक्ष) – 1 हजार 968

गजानन धांडे (अपक्ष) -4 हजार 854

दिनकर संबारे (अपक्ष) -4 हजार 564

नंदु लवंगे (अपक्ष) – 5 हजार 713

प्रताप पाटील (अपक्ष) – 2 हजार 561

बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – 3 हजार 931

रविकांत तुपकर (अपक्ष) – 2 लाख 49 हजार 963

रेखा पोफळकर (अपक्ष) – 1 हजार 540

संदीप शेळके (अपक्ष) – 13 हजार 050

नोटा – 3 हजार 786

एकूण वैध मते – 11 लाख 9 हजार 496

पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – 110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *