BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं. स. नागभीड / ब्रम्हपुरी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक, नागभीड यांच्यावर ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये 2 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून ते कार्यालयातून गायब

Summary

प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं. स. नागभीड / ब्रम्हपुरी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक, नागभीड यांच्यावर ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये 2 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून ते कार्यालयातून गायब असल्यामुळे त्यांचा प्रभार इतरांकडे सुपूर्द करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे […]

प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं. स. नागभीड / ब्रम्हपुरी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक, नागभीड यांच्यावर ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये 2 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून ते कार्यालयातून गायब

असल्यामुळे त्यांचा प्रभार इतरांकडे सुपूर्द करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे केली असून त्या पत्राच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यसचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविले आहे.प्रभारी गटशिक्षणाधिकारी नागभीड / ब्रम्हपुरी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक नागभीड यांच्यावर ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्र.178/2021 2 एप्रिल 2021 रोजी अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायदा व भा. द. वी. च्या 306 अन्वये गुन्हा दाखल झाल्यापासून ते नागभीड व ब्रम्हपुरी पंचायत समिती कार्यालयातुन गायब झालेले आहेत. त्यामुळे पंचायत समिती मधील प्रशासकीय कामे ठप्प पाडली आहेत. शिक्षकांचे अनेक कामे त्यांच्या गायब होण्यामुळे प्रलंबित आहेत. प्रमोद नारायण नाट, प्रभारी गटशिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी / नागभीड तथा शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याचे दररोज वर्तमान पत्रात बातम्या प्रसारित होत आहेत. त्यामुळे गटविकासअधिकारी पंचायत समिती नागभीड व ब्रम्हपुरी यांनी पोलीस विभागाकडून तात्काळ अहवाल मागवून वस्तुस्थिती जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक होते. यापूर्वी सुद्धा 10 मार्च 2021 रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी नागभीड – ब्रम्हपुरी यांच्यावर सुधारित अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायदा -2015 अन्वये गुन्हा दाखल होऊन ते त्यावेळी सुद्धा ते आठ दहा दिवस गायब होते. गटशिक्षणाधिकारी यांना हजेरी पाlटावर स्वाक्षरी करणे बंधनकारक नसल्यामुळे त्यांचे फावत असून त्यांचे कार्यालयातून गायब असताना वेतन काढले जाते ही बाब गंभीर स्वरूपाची असून या बाबतीत सुद्धा गटविकासअधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात यावे. सध्याच्या परिस्थितीत मार्च एंडिंग सुरु असून शासनाचा निधी खर्च करणे अपेक्षित असून गटशिक्षणाधिकारी यांच्या गैरहा जरीमुळे शासन निधी परत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत गटशिक्षणाधिकारी पदाचा ब्रम्हपुरी व नागभीड पंचायत समितीचा प्रभार तात्काळ प्रभावाने इतर अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनात करण्यात आली असून जिल्हा परिषद प्रशासनाने स्वतः हुन त्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढणे अपेक्षित असताना प्रशासन गप्प का आहे हे न समजन्यापलीकडचे कारण आहे. जिल्हा परिषद प्रशासन हे प्रमोद नाट यांच्याकढील प्रभार काढण्यासाठी एवढा विलंब करून तर त्याची पाठराखण तर करीत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *