कोरोना योद्धा सन्मान सोहळा पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क व डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,नागपूर च्या वतीने
प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर
नागपुर : पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क व डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,नागपूर च्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान सोहळा आज नागपुर येथे घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.किशोरजी कुमेरिया माजी महापौर नागपुर ,उद्घाटक मा. सुधाकर कोहळे माजी आमदार (दक्षिण नागपुर), प्रमुख पाहुणे मा.दुनेश्वर पेठे (नगरसेवक म.न.पा नागपुर) राजकुमार खोब्रागडे (मुख्य संपादक तथा डायरेक्टर)
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क व सर्व पदाधिकारी डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद चे उपस्थित होते.
वैश्विक महामारी कोविड-१९ कोरोनाच्या भयभीत परिस्थितित ज्या जागृत लोकांनी सामाजिक दायित्व समजून लोकांना मदतीचा हात पूढे केला आणि अन्न, फळे,मास्क,साॅनीटायजरचे वितरण केले तसेच आपला जीव मुठीत धरून कार्य करणाऱ्या कोरोना योद्धा म्हणून सत्कारमूर्ती विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी चंद्रपुर सी.टी.पी.एस. च्या कर्मचारांचे विशेष सत्कार करण्यात आले.