पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट! आठ ते दहा दिवसांनी होतो पाणीपुरवठा

कोंढाळी-
: काटोल तालुक्यातील पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट करावी लागत आहे! राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मात्र पुसागोंदी या गावात मागील दोन वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यापासूनच भिषण पाणी टंचाई जाणवू लागते.
तर येथील जल जीवन मिशन ची विहिरी नव्याने घोषीत बफर झोन मधे येत असल्याने वन वनखात्याच्या नियमावली चे कचाट्यात सापडलेल्याने तसेच विद्यमान पाणी पुरवठा विहिरी आटल्यातच जमा झाल्याने पुसागोंदी येथील महिलांना मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जबर पायपीट करावी लागत असल्याची माहिती माजी उपसरपंच हरिष राठोड तसेच माजी सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
पुसागोंदी गावात मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई जाणवत असल्याने गाव आणि वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे ग्राम पंचायत पुसागोंदी चे ग्राम पंचायत सचीवांनी. पाणी अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केला आहे तरी ही पुसागोंदी येथील लाडक्या बहिणींना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे .
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पुसागोंदी बंजारा तांड्याला पावसाळ्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेलीच आहे.
दोन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या विहिरींनी तळ गाठला आहे.
गावात असलेली नळपाणी योजनाही कुचकामी ठरली असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना खाजगी विहिरीचा आसरा घ्यावा लागत असून अजूनही त्या अधिग्रहित विहिरीतील पाणीही मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
गावात पाणी टंचाई असताना देखील आजही या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही आहे.
गावातील नागरिक आपली तहान भागवण्यासाठी पायपीट करत असले तरी गावातील जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पुसागोंदी येथील लाडक्या बहिणींना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पुसागोंदी गावात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत आहे. पुसागोंदी या गावा या करिता या भागाचे आमदार, एस डी ओ, तहसीलदार, बी डी ओ, ग्राम सचीव यांनी पुसागोंदी (बंजारा तांडा) या गावात प्रत्यक्ष पाहणी करून येथील पिण्यासाठी योग्य सोय करावी अशी मागणी माजी सरपंच रामचंद्र चव्हाण, उपसरपंच हरिष राठोड ,किसन राठोड तसेच येथील महिला पुरूष नागरिकांनी केली आहे. माजी सभापती संजय डांगोरे यांनी या प्रकरणी संबंधित विभागांना भिषण पाणी टंचाई चे काळात पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी अधिग्रहण करण्यात यावे व शासनाने ठोस उपाययोजना करावी अशी माहिती दिली आहे.
या प्रकरणी काटोल चे सह बी डिओ गुंजकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की विहिरी अधिग्रहण करण्यात आली आहे मात्र तेथून ही पाणी पुरवठा होत नाही, या करिता आणखी अन्य विहीर अधिग्रहण करण्यात येईल .तर तहसीलदार राजू रणवीर यांचे सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पाणी टंचाई चे गावांचे ग्राम सचीवांना विहिरी अधिग्रहण करण्याची सुचना देण्यात आल्याचे सांगितले.