पालिकेच्या नायर रूग्णालयांत अनागोंदी कारभार..!
Summary
मुंबई महापालिकेच्या बा.य.ल.नायर रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहातील विविध समस्यांकडे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर दुर्लक्ष करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासुन रूग्णांना पुरविण्यात येणार्या जेवणामध्ये कधी भात नसतो तर कधी चपाती,तर कधी भाजी नसते.त्यामुळे स्वयंपाक गृहातील कर्मचाऱ्यांना रूग्णांकडुन लक्ष केले जात आहे. सार्वजनिक […]
मुंबई महापालिकेच्या बा.य.ल.नायर रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहातील विविध समस्यांकडे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर दुर्लक्ष करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासुन रूग्णांना पुरविण्यात येणार्या जेवणामध्ये कधी भात नसतो तर कधी चपाती,तर कधी भाजी नसते.त्यामुळे स्वयंपाक गृहातील कर्मचाऱ्यांना रूग्णांकडुन लक्ष केले जात आहे.
सार्वजनिक आरोग्य खात्याचे हजारो कोटीचे बजेट असणार्या पालिकेला रुग्णालयात भरती रुग्णांना दोन वेळचे व्यवस्थित जेवण देता येत नसेल तर ही बाब भूषणावह नाही. विशेष म्हणजे सदर रूग्णालयात ३ ते ४ नवीन ईमारतींचे हजारो कोटी रुपयांचे बांधकाम सध्या जोरात चालु आहे.पण त्याच रूग्णालयांत रूग्णांना जेवण देण्यासाठी प्रशासनाकडे फंड उपलब्ध नाही.याबाबत प्रशासनातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवुन आपली जबाबदारी टाळत आहेत.संबंधीत काही प्रस्ताव मंजुरीसाठी महीनोंमहीने प्रलंबित ठेवणार्या अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांना कोणत्याच विषयाचे गांभीर्य नसल्याचा आरोप ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे’ उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी केला आहे.
रूग्णालयात भरती असलेल्या साधारणपणे १००० रूग्णांना सकाळी नाश्त्याच्यावेळी ५०० चपाती, ब्रेड, दूध, अंडी ई. तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणात चपाती,भात,डाळ एवढं मोजकंच जेवण दिलं जातं. स्वयंपाक गृहात कधीच तेल उपलब्ध नसल्याने रूग्णांना बिनतेलाच्या चपात्या दिल्या जातात.मागील ५ ते ६ दिवसांपासुन रूग्णांना भात दिला जात नाही कारण तांदुळ खरेदी करण्यासाठी भांडार कक्षाकडे निधी उपलब्ध नाही.यावर उपाययोजना म्हणुन जर १००० चपाती लागत असतील तर कार्यरत स्वयंपाकी यांना २००० चपाती लाटून देण्याची सक्ती करण्यात येत आहे.स्वयंपाक गृहात एकुण १७ स्वयंपाकी आवश्यक असताना केवळ ५ कार्यरत आहेत. तसेच १० सहाय्यक स्वयंपाकींची पदे रिक्त आहेत.अश्या परिस्थितीत रूग्णांना जेवण पुरविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन द्यावे तसेच रिक्त पदे भरुन कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा अशी मागणी कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर व जेष्ट चिटणीस हेमंत कदम यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.