नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला
नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला
कन्हान :- नेशनल इन्श्योरेन्स कंपनी व्दारे पटेल नगर कन्हान येथील विमाधारक स्वर्गीय अनिल तिरपुडे यां चा साई मंदीर जवळ दुचाकी अपघातात मुत्यु झाल्या ने विमा कंपनी ने त्याच्या वारसाना १५ लाखाचा धना देश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.
नेशनल इन्श्योरेन्स कंपनी लिमिटेड शाखा कार्या लय कन्हान द्वारे स्वर्गीय अनिल प्रल्हाद तिरपुडे राह. पटेल नगर कन्हान यांनी दुचाकी वाहनाचा विमा काढ ला होता. परंतु साई मंदिर कन्हान-कामठी रोडवर त्यां च्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुर्भाग्य वंश त्यां चा मृत्यु झाल्यामुळे त्यांचे वारसदार म्हणुन त्यांच्या पत्नी छाया तिरपुडे, मुलगा प्राज्वल, मुलगी सानिया तिरपुडे यांना बिझनेस सेंन्टर इंचार्ज श्री छगन पौनिकर यांच्या हस्ते १५ लाखांचा धनादेश देऊन कंपनी च्या वतीने त्वरित आर्थिक मदत करण्यात आली. सदर विमा मिळवुन देण्यास नागपुर मुख्य क्षेत्रीय प्रबंधक वाय आर स्टिव्हन, सीनियर डिव्हीजनल मॅनेजर विशाल पाटील, असिस्टंट मॅनेजर संजय गावपांडे, रिजनल मॅनेजर ए एन चव्हान व कलेम हब इंचार्ज अनिल भुल यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी कार्यक्रमास कार्यालयातील अभिकर्ता संदीप भोयर, अजय चव्हान, सुरेश सुर्यवंशी, रामकृष्ण राऊत, पवन माने, सुनील आंबागडे, धर्मेंद्र चहांदे, अमोल उमाळे, शिव वानखेडे सह नागरिक उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो 9579998535