नाकाडोंगरी ग्राम पंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या ३४८व्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त माननीय आयुक्त ग्रा.प. विभाग (नागपूर) यांच्या अनुषंगाने माननीय जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधीकारी यांच्या आदेशानुसार माननीय गटविकास अधिकारी माननीय धिरज पाटील […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या ३४८व्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त माननीय आयुक्त ग्रा.प. विभाग (नागपूर) यांच्या अनुषंगाने माननीय जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधीकारी यांच्या आदेशानुसार माननीय गटविकास अधिकारी माननीय धिरज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननिय सरपंच सौ.सारिकाबाई कोटपल्लीवार व उपसरपंच श्री.विश्वकांतजी घडले यांच्या उपस्थितीत *शिव राज्याभिषेक सोहळा* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रामुख्याने सुमीतजी गौपाले,कपीलजी जैन,राजनजी गौपाले,विजयजी राऊत ग्रा.प.सदस्य तथा सौ.बिंदुबाई उके ,सौ.उर्वसीबाई झोळे,सौ. शामलताबाई पारधी,सौ.मिनाताई मेश्राम,सौ.वासंतीबाई नाकाडे आदि ग्रा.प. सदस्या त्याचप्रमाणे गावातिल डॉ.सचीन बावणकर, रहांगडाले सर,आशीष उचीबगले व ग्रा.प.कर्मचारी श्रीकांत झोळे, मनिष जांभुरे,रवि मेश्राम आदी उपस्थित होते.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259