हेडलाइन

देसाईगंजात जनता कर्फ्युला सहकार्य करा पञकार परिषदेत आमदार कृष्णा गजबे यांचे नागरिकांना आवाहन

Summary

मंगला गिरीशसिंग चुंगडे महिला न्युज रिपोर्टर वडसा देसाईगंज-दि.26 सप्टेंबर       देसाईगंज शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना महामारीची साखळी तोडणे काळाची गरज झाली असल्याने सर्वांच्या सुरक्षेसाठी देसाईगंज शहरात लावण्यात आलेल्या जनता कर्फ्युला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरमोरी […]


मंगला गिरीशसिंग चुंगडे

महिला न्युज रिपोर्टर

वडसा


देसाईगंज-दि.26 सप्टेंबर      

देसाईगंज शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना महामारीची साखळी तोडणे काळाची गरज झाली असल्याने सर्वांच्या सुरक्षेसाठी देसाईगंज शहरात लावण्यात आलेल्या जनता कर्फ्युला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आज दि.26 सप्टेंबर रोजी कार्यालयात घेतलेल्या पञकार परिषदेतुन केले आहे.

देसाईगंज शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.24 सप्टेंबर रोजी शहरातील प्रतिष्ठित नागरीक,व्यापारी, पदाधिकारी,सर्व विभाग अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दि.27 सप्टेंबर पासुन ते 6 ऑक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यु लावण्या संदर्भात एकमताने निर्णय घेतला होता. माञ शहरातील काही नागरिकांनी बैठकिला बोलावले नसल्याचे सबब पुढे करून स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे,ज्यामुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 वास्तवात शहरात लावण्यात येत असलेला जनता कर्फ्यु हा स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फुर्तिने घेतलेला निर्णय असुन सर्वांच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांची कुटंबचे कुटुंब अडचणीत येऊ लागले आहेत.यामुळे अनेक गोरगरीब अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. यास्तव कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान 10 दिवसाचा जनता कर्फ्यु लावणे अत्यावश्यक असुन लावण्यात येत असलेला जनता कर्फ्यु हा कुठल्याही राजकीय हेतुने प्रेरीत नसुन सर्व पक्षिय पदाधिका-यांच्या संमतीनेच लावण्यात येत असल्याने दरम्यान प्रशासकीय अधिका-यांना यथायोग्य सहकार्य करून नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हिताने सहभाग नोंदवून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपापली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी दरम्यान पञकार परिषदेतुन केले आहे. 

दरम्यान पाच दिवसानंतर शहरातील किराणा दुकान, भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सामाजिक दुरीकरणाच्या नियमा अंतग॔त,तोंडावर रुमाल अथवा मास्कचा वापर करून दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पञकार परिषदेला आमदार कृष्णा गजबे,किसन नागदेवे,संतुमल श्यामदासानी, श्याम धाईत,मोतिलाल कुकरेजा,गणेश फाफट,नंदु चावला,राजु जेठानी, शहरातील प्रतिष्ठित नागरीक, किराणा व्यापारी,कपडा व्यापारी,सब्जी भाजीपाला विक्रेते,व्यापारी तसेच पञकार प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *