BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

Summary

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची […]

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्ज, बारामती – ५१ उमेदवारांचे ६६ अर्ज, उस्मानाबाद – ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज, लातूर – ३६ उमेदवारांचे ५० अर्ज, सोलापूर – ४१ उमेदवारांचे ५३ अर्ज, माढा – ४२ उमेदवारांचे ५५ अर्ज, सांगली – ३० उमेदवारांचे ३९ अर्ज, सातारा – २४ उमेदवारांचे ३३ अर्ज, रत्नागिरी -सिंधुदुर्ग – ९ उमेदवारांचे १३ अर्ज, कोल्हापूर – २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज दाखल झाले आहेत.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *